
मुंबई : मुंबईत क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी Mumbai Drugs Case आर्यन खान Aryan Khan याला अटक झाल्यावर आणि मंत्री नवाब मलिक Nawab Malik यांच्या खळबळजनक आरोपांमुळे सध्या एनसीबीचे मुंबई विभागीय अधिकारी समीर वानखेडे Sameer Wankhede चांगेलच चर्चेत आहेत. नवाब मलिकांकडून वानखेडे यांच्यावरती आरोपांच्या टीका झडत असतानाव्ह दुसऱ्या बाजूला आता वानखेडे यांच्या समर्थनार्थमध्ये देखील काही संघटना पुढे येऊ लागले आहेत.
मुंबईत एनसीबी कार्यालयाबाहेर आज शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान नावाच्या संघटनेने वानखेडे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर समीर वानखेडे कार्यालयात दाखल होत असताना त्यांच्यावर फुलांचा वर्षाव देखील करण्यात आला आहे. तसेच वानखेडे यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन त्यांचा जंगी सत्कार देखील करण्यात आला आहे.
पहा व्हिडिओ-
'समीर वानखेडे तुम आगे बढो...हम तुम्हारे साथ है', 'हर हर महादेव' या घोषणांनी एनसीबी कार्यालयाबाहेर शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी वानखेडेंचा सत्कार करण्यात आला आहे. तसेच ड्रग्ज माफियांच्या विरोधात कारवाई करुन, समीर वानखेडे चांगलेच काम करत आहेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका करुन त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम काही जण करत आहे.
पण आम्ही त्यांच्या बरोबर राहणार आहोत. पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो आहोत, असे शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्याने सांगितले आहे. समीर वानखेडे यांनीही शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी केलेला सत्कार स्वीकारला आणि त्यांचे आभार व्यक्त केला आहे. यावेळी वानखेडेंनीही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ते नेहमीप्रमाणे आपल्या कार्यलयीन वेळेत एनसीबीच्या कार्यालयात पोहोचले होते.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.