Mumbai Mega Block: मुंबईकरांचा खोळंबा होणार, रविवारी 'या' मार्गांवर मेगाब्लॉक; लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द

Mumbai Local Train Mega Block: उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत तांत्रिक कामे करण्यासाठी रेल्वेने उद्या म्हणजेच रविवारी मेगाब्लॉक जाहीर केला आहे.
Railways announces mumbai mega block on Central Harbour and Western route on Sunday
Railways announces mumbai mega block on Central Harbour and Western route on SundaySaam TV
Published On

Mumbai Local Train Mega Block News Today

दिवाळीनिमित्त गावाहून मुंबईत दाखल होणाऱ्या प्रवाशांचा उद्या खोळंबा होण्याची शक्यता आहे. कारण, उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत तांत्रिक कामे करण्यासाठी रेल्वेने उद्या म्हणजेच रविवारी मेगाब्लॉक जाहीर केला आहे.

या ब्लॉकदरम्यान लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप-डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे अप-डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Railways announces mumbai mega block on Central Harbour and Western route on Sunday
Kunbi Records: राज्यात कुणबी नोंदी तपासण्याचं काम वेगात; विदर्भात सापडल्या सर्वाधिक नोंदी, मराठवाड्यात किती? वाचा...

दुसरीकडे पश्चिम मार्गावर शनिवारी रात्री ११ वाजेपासून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी दिवसभर या मार्गावर कुठलाही ब्लॉक नसेल.

मध्य रेल्वे मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-विद्याविहार अप-डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी १०:५५ ते दुपारी ३:५५ पर्यंत ब्लॉक घेतला जाईल. परिणामी सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान धावणाऱ्या गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे अप-डाऊन हार्बर मार्गावर रविवारी सकाळी ११:१० ते सायंकाळी ४:१० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी /वडाळा रोड येथून वाशी/बेलापूर/पनवेल करीता आणि सीएसएमटी येथून वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द असणार आहे.

याशिवाय पनवेल/बेलापूर/वाशी आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटीसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. ब्लॉक कालावधीत प्रवाशांच्या सुविधेसाठी पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्री ब्लॉक

पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानका दरम्यानचा आज म्हणजे शनिवारी रात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. पाचव्या मार्गावर रात्री साडे अकरा ते मध्यरात्री साडेतीन वाजेपर्यत दुरुस्ती करण्यात येणार आहे. दरम्यान रविवारी कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.

Railways announces mumbai mega block on Central Harbour and Western route on Sunday
Whale Fish Death: समुद्र किनारी आलेल्या बेबी व्हेलचा मृत्यू कशामुळे झाला? शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com