Konkan Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी कोकणवासियांची गावाकडे जायची सोय झाली; रेल्वे तिकीट बुकिंगबाबत मोठी अपडेट

Konkan Railway Booking: कोकणकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्याचं आरक्षण उद्यापासून म्हणजेच शनिवारपासून (ता. ४) सुरू होणार आहे.
 konkan Ganpati Special Train 2023
konkan Ganpati Special Train 2023Saam TV

Konkan Railway Ganpati Booking 2024

कोकणकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्याचं आरक्षण उद्यापासून म्हणजेच शनिवारपासून (ता. ४) सुरू होणार आहे. यंदाच्या वर्षी ७ सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. त्यासाठी १२० दिवस आधीपासूनच कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे बुकिंग सुरू होणार आहे.

 konkan Ganpati Special Train 2023
Pune Traffic News: पुण्यातील वाहतुकीत ४ मे पासून मोठे बदल; अनेक रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

त्यामुळं यंदा चाकरमान्यांना कन्फर्म तिकिट मिळण्याची दाट शक्यता आहे. गणेशोत्सव आणि कोकण यांचे वेगळेच नाते आहे. दरवर्षी कोकणात गणेशोत्सवाचा सण धुमधडाक्यात साजरा केला होता. यासाठी मुंबईतील अनेक चाकरमानी कोकणात जात असतात.

मात्र, गावाकडे जाण्यासाठी त्यांना दोन महिने आधीपासूनच तयारी करावी लागते. कारण, गणेशोत्सवाच्या काळात लवकर तिकीट मिळत नाही. तसेच ट्रेनमध्ये मोठी गर्दी देखील असते. त्यामुळे रेल्वे प्रशासनदेखील गणेशोत्सवासाठी ज्यादा गाड्या सोडते.

याशिवाय तिकीट बुकिंगला देखील दोन ते तीन महिन्यांच्या आधीच सुरूवात होते. यंदा कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे बुकिंग शनिवार ४ मेपासून सुरू होत आहे. त्यामुळं यंदा चाकरमान्यांना कन्फर्म तिकिट मिळण्याची दाट शक्यता आहे.

नागरिकांनी लवकरात लवकर तिकिटांचे बुकिंग करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. तसंच, गणेशोत्सव स्पेशल गाड्याही लवकरच सोडण्यात येतील, त्याबाबत अधिकृत माहिती जाहीर केली जाईल, असंही सांगण्यात आलं आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या ट्रेनचे वेळापत्रक

  • शनिवार ४ मे 2024 रोजी १ सप्टेंबरचं रेल्वे आरक्षण सुरु होईल. प्रवासी ऑनलाइन तिकीट बुकिंग करू शकता.

  • रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या मार्गावर जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचं बुकिंग मंगळवार ७ मे रोजी सुरु होईल.

  • ६ सप्टेंबर रोजी हरतालिका असून याच बुकिंग गुरुवारी ९ मे पासून सुरु होईल.

  • ७ सप्टेंबरला गणेश चतुर्थी असून यादिवशी घरोघरी गणरायांचे आगमन होईल. तेव्हा रेल्वे बुकिंग शुक्रवार १० मे रोजी सुरु होईल.

 konkan Ganpati Special Train 2023
Baramati Lok Sabha: सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नोटीस, नेमकं कारण काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com