Jagtik Mahila Din : काळया फिती लावून महिलांचा रेल्वे प्रवास; जाणून घ्या कारण

या आंदाेलनात माेठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या हाेत्या.
International Women's Day 2023
International Women's Day 2023saam tv

- अभिजित देशमुख

International Women's Day 2023 : जागतिक महिला दिननिमित्त (International Women's Day Latest News) उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या महिलांनी काळया फिती लावून रेल्वे प्रवास केला. महिला प्रवाशांच्या समस्यांकडे दुर्लक्ष हाेत असल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महिलांना आज अनाेख्या पद्धतीने हे आंदाेलन (aandolan) छेडलं.

International Women's Day 2023
Praniti Shinde News: हाथ से हाथ जोड़ो अभियानात प्रणिती शिंदेची पंतप्रधान नरेंद्र माेदींवर टीका, म्हणाल्या हुकूमशाही...

मध्य रेल्वेच्या उपनगरीय ट्रेनमधील महिलांची वाढत जाणारी गर्दी व प्रवासातील महिलांची असुरक्षितता याकडे दुर्लक्ष करणाऱ्या रेल्वे प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज महिला दिनी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघकडून महिला प्रवाशांना काळी फीत लावून प्रवास करण्याचा आवाहन करण्यात आलं होतं.

International Women's Day 2023
Satara News: झुकेगा नहीं साला ! डायलॉगबाजीने तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या उदयनराजेंच्या भूमिकेकडे लागलं लक्ष

आज सकाळपासून आसनगांव, टिटवाळा, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली या स्टेशनवरील प्रवासी संघटना प्रतिनिधी महिलांना काळ्या फितीचे वाटप करण्यात आले. यावेळी महिलांनी काळया फिती लावून रेल्वे प्रवास करत प्रशासनाचा निषेध नोंदवला.

डोंबिवली रेल्वे स्थानकावर संघटनेच्या महिला तसेच महिला प्रवासी देखील हातात फलक घेऊन काळया फिती लावून रेल्वे प्रशासनाचा निषेध करत होत्या. यावेळी लता अरगडे (सरचिटणीस, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ) यांच्यासह माेठ्या संख्येने महिला आंदाेलनात सहभागी झाल्या हाेत्या. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com