संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
कल्याणमध्ये फर्निचर शोरूममध्ये अजगर शिरल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील गंधारी परिसरात एका फर्निचरच्या शोरूममध्ये भलामोठा अजगर शिरल्याची घटना घडली. अचानक समोर आलेल्या या अजगरामुळे शोरूममधील कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच वॉर फाऊंडेशनच्या सदस्यांना बोलावण्यात आले. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अजगाराला मोठ्या शिताफीने पकडले.
यानंतर पकडलेल्या अजगराला सुरक्षितरित्या अग्निशमन विभागाच्या ताब्यात देनये आले. या संपूर्ण कारवाईदरम्यान कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र गांधारी परिसरात अजगर आढळण्याची ही तिसरी घटना असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिसरात वन्यजीवांचा वावर वाढत असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून संबंधित यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.