Ashadha Month: शेवट आखाडसाठी पुणेकरांची मटण आणि चिकन मार्केटमध्ये गर्दी, दुकानांबाहेर लांबच लांब रांगा|Video

Punekar Crowd In Chicken and Mutton Shops: श्रावण महिना सुरू होण्याआधी अनेकजण मटण आणि चिकनवर ताव मारतात. आज आषाढ महिन्यातील अखेरचा रविवार असल्याने अनेकांनी मटणाच्या दुकानावर गर्दी केलीय.
Crowd In Chicken and Mutton Shops
Punekar Crowd In Chicken and Mutton ShopsSaamtv
Published On

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

येत्या गुरुवारपासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी नॉनव्हेज प्रेमींनी पुण्यातल्या मटण आणि चिकन मार्केटमध्ये मोठी गर्दी केली. आज रविवार असल्यानं मांसाहारीसाठी आज पर्वणीच. आषाढ महिन्यात मांसाहार टाळला जातो. त्यामुळे आषाढ संपल्यावर पहिल्यांदाच मांसाहार करण्यासाठी लोकांमध्ये उत्साह असतो. (Massive crowd seen in Pune mutton and chicken shops before Shravan begins)

आज आखाड महिन्यातील शेवटचा रविवार असल्याने पुणेकरांनी पहाटेपासूनच मटण आणि चिकन दुकानाच्या बाहेर रांगा लावल्या आहेत. या मटणाच्या दुकानाच्या बाहेर गेलेली पाहायला मिळत आहे. पहाटे सहापासून लोकांनी भली मोठी रांग पुण्यातील मटण दुकानांच्या बाहेर लावलेली आहे. आषाढ संपल्यावर मटण आणि चिकनची मागणी वाढते, त्यामुळे बाजारात जास्त आवक असते.

Crowd In Chicken and Mutton Shops
Pune Crime : पुणे हादरलं! पाठलाग केला, जबरदस्तीने जंगलात नेलं अन्...; महिलेसोबत नको ते घडलं

तीन दिवसात श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे, त्यानंतर या नॉनव्हेज प्रेमींना मटण आणि चिकन खाता येणार नाही. म्हणून आजच बहुतेकजण आपल्या आवडत्या नॉनव्हेज पदार्थांवर ताव मारणार आहेत. यासाठीच शहरातील सर्व दुकानांबाहेर मटण आणि चिकन खरेदीसाठी आता पुणेकरांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. पुण्याच्या मटण मार्केट मधून आज जवळपास 3000 किलो मटणाची विक्री होण्याचा अंदाज विक्रेत्यांनी वर्तवला आहे.

Crowd In Chicken and Mutton Shops
Pune Crime : पुणे पोलिसांची मोठी कारवाई! बुधवार पेठेत छापेमारी, पाच बांगलादेशी महिलांना अटक

शुक्रवारपासून श्रावण महिना सुरू होतोय. त्यामुळे अनेकजण आज गटारी आमवस्या साजरी करत आहे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांनी प्रचंड गर्दी केलीय. त्र्यंबकमध्ये संपूर्ण हॉटेल फुल झाली आहेत. नाशिक शहरातील हॉटेलसुद्धा फूल झाल्या असून भाविकांना रुम मिळत नसल्याचं चित्र आहे. उत्तर भारतात श्रावणला सुरूवात झालीय. भगवान महादेवाचं दर्शन घेण्यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांनी गर्दी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com