लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी पुण्याच्या तरुणाचा मृत्यू

Pune Youth Dies During Lalbaugcha Raja Darshan In Mumbai: मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पुण्याहून आलेल्या जयदीप मेघराज नेमाडे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अस्वस्थ वाटल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता असून काळाचौकी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
Lalbaugcha Raja Darshan,
Lalbaugcha Raja Darshan,saam tv
Published On: 

मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनाला पुण्याहून आलेल्या एका तरुण भाविकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जयदीप मेघराज नेमाडे असे मृत्यू पावलेल्या तरूणाचे नाव आहे. तो लालबाग बिल्डींग नंबर 3 जवळ मित्रांसोबत बसलेला होता. त्यावेळी त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याचवेळी त्याला लालबाग गणेश उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ॲम्बुलन्सने ग्लोबल हॉस्पिटल येथे दाखल केले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. काळाचौकी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जयदीप हा यंदाही दरवर्षीप्रमाणे लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी मित्रांसोबत मुंबईला आला होता. रांगेत उभे असताना त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्रास सुरू झाल्याचे त्याने आपल्या मित्राला सांगितले आणि ते सर्वजण रांगेतून बाहेर पडले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी त्याला तात्काळ मदत कक्षात नेले आणि रुग्णवाहिकेने हलवले. मात्र उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले.

Lalbaugcha Raja Darshan,
गणेशोत्सवाच्या उत्साहाला गालबोट, २२ फुटी बाप्पाची मूर्ती अचानक कोसळली, २ जणांचा मृत्यू, ५ गंभीर

जयदीप मेघराज मेघराज नेमाडे हा जळगाव जिल्ह्यातील शिरसोली रोडवरील जीवनमोती सोसायतील रहिवासी होता. त्याचे वडील मेघराज सुभाष नेमाडे हे नेमाडे ट्रान्सपोर्टचे संचालक आहेत. जयदीप कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या आईचे 12 वर्षांपूर्वी निधन झाले होते. जयदीप हा उच्चशिक्षित मुलगा होता आणि तो पुण्यात नोकरी करत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com