खळबळ! मुंबईत मंत्रालयाच्या गेटसमोर पुण्याच्या महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबईत मंत्रालयाच्या आऊट गेटसमोर एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला असून या घटनेमुळे मंत्रालय परिसरात खळबळ उडाली होती.
Mantralaya
Mantralayasaam TV
Published On: 

मुंबई: मुंबईत मंत्रालयाच्या (Mumbai Mantralaya) आऊट गेटसमोर आज, सोमवारी संध्याकाळी एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे मंत्रालय परिसरात खळबळ उडाली. मंत्रालयाच्या गेटसमोर आत्महत्येचा प्रयत्न करणारी ही महिला पुण्यातील चिखली येथील रहिवासी आहे. तिने हे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या महिलेला रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार करण्यात आले. महिलेवर गुन्हा नोंदवण्यात आला असून, अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयाच्या आऊट गेटसमोर आज, सोमवारी संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पुण्याच्या (Pune) चिखली येथील ४५ वर्षीय महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. महिला सुरुवातीला विष प्यायली. त्यानंतर तिने स्वतःवर ब्लेडनेही वार करून घेतले.

हे देखील पाहा -

महिलेने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले यामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. ही महिला जखमी झाली असून, तिच्यावर जीटी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. संबंधित महिलेविरोधात मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात कलम ३०९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच अटकेची कारवाई देखील करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मरीन ड्राइव्ह पोलीस करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.