पुणे मेट्रोतील प्रवास होणार पर्यावरणपूरक... (पहा व्हिडीओ)

पुणे मेट्रोत आता प्रवास करताना, सायकल पण सोबत नेता येणार. या बद्दलची घोषणा आज पुणे मेट्रोच्या वतीने पिंपरी - चिंचवड शहरात करण्यात आली.
पुणे मेट्रोतील प्रवास होणार पर्यावरणपूरक... (पहा व्हिडीओ)
पुणे मेट्रोतील प्रवास होणार पर्यावरणपूरक... (पहा व्हिडीओ)गोपाल मोटघरे
Published On

गोपाल मोटघरे

पुणे : पुणे मेट्रोत आता प्रवास करताना, सायकल पण सोबत नेता येणार. या बद्दलची घोषणा आज पुणे मेट्रोच्या वतीने पिंपरी - चिंचवड शहरात करण्यात आली. मात्र पुणे मेट्रो मध्ये होणारी संभाव्य प्रवासी गर्दी पाहता प्रवास करत असताना खरंच सायकल सोबन नेणं सोपं होणार का ? असे अनके प्रश्न पुणेकरांना भेडसावत आहेत.

पुणे मेट्रोत प्रवास करत असताना नागरिकांन मध्ये सायकल चालविण्याची देखिल संधी मिळावी या उद्देशाने, आज  पिंपरी - चिंचवड शहारत फुगेवाडी ते तुकाराम नगर मेट्रो स्टेशन मार्गावर पुणे मेट्रोच्या वतीने एक खास सायकल रॅली आयोजित करण्यात आली.

या रॅलीत महा मेट्रोचे मुख्य संचाकल ब्रिजेश दीक्षितसह पुणे मेट्रोचे अधिकारी आणि कर्मचारी देखिल सायकल घेऊन सहभागी झाले. विशेष म्हणजे या वेळी पुणे मेट्रोच्या वतीने मेट्रोत सायकल स्वारांनी सायकल सोबत नेत प्रवास केला. पुणे मेट्रो अधिक पर्यावरण बनविण्याकरिता, पुणे मेट्रो पुर्ण क्षमतेने सुरू झाल्या नंतर पुणेकरांना पुणे मेट्रोत सायकल कॅरी करण्याची परवानगी देण्यात येईल असं पुणे मेट्रोचे मुख्य व्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी सांगितलं.

पुणे मेट्रोतील प्रवास होणार पर्यावरणपूरक... (पहा व्हिडीओ)
पत्नीच्या मृत्यूचे दुःख; जळत्या चितेवर पतीने मारली उडी!

आधीच वाहतूक कोंडी ने वैतागलेले पुणेकर पुण्यात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात, सार्वजनिक वाहतूक करत असताना आधीच पुणेकर एकमेकांना खेटून उभे असतात, त्यात मेट्रोत सायकल घेऊन कसा  प्रवास करायचा ?  मेट्रोत बसून की उभं  राहून प्रवास करायचा ? आणि सायकल धावत्या मेट्रोत कुठे ठेवायची ? असे अनेक प्रश्न पुणेकरांना पडले आहेत. 

सायकली च शहर अशी एकेकाळी पुणे शहारची ओळख होती, ती ओळख पुण्याला परत मिळवून देण्यासाठी, बहुदा पुणे मेट्रोने मेट्रोत सायकल सोबत घेऊन प्रवास करण्याची घोषणा केली असावी. मात्र घोषणा करत असताना त्या घोषणेची अंमलबजावणी नीट करता येईल का ? त्यासाठी कशा प्रकारे यंत्रणा उभारता येईल याच देखील योग्य नियोजन पुणे मेट्रोने करणं अत्यंत गरजेच आहे. 

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com