पत्नीच्या मृत्यूचे दुःख; जळत्या चितेवर पतीने मारली उडी!

ओडिशाच्या कालाहांडी जिल्ह्यातून आत्महत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एक 65 वर्षीय पुरुष आपल्या पत्नीपासून अंतर सहन करू शकला नाही आणि तिच्या चितेत उडी मारली आहे.
पत्नीच्या मृत्यूचे दुःख; जळत्या चितेवर पतीने मारली उडी!
पत्नीच्या मृत्यूचे दुःख; जळत्या चितेवर पतीने मारली उडी!Saam TV
Published On

कालाहंडी: ओडिशाच्या कालाहांडी जिल्ह्यातून आत्महत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एक 65 वर्षीय पुरुष आपल्या पत्नीपासून अंतर सहन करू शकला नाही आणि तिच्या चितेत उडी मारली आहे.

हे देखील पहा-

आगीत जळाल्याने वृद्धाचा मृत्यू;

या दुःखद घटनेनंतर, वृद्ध व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. त्या वृद्धांचे प्राण वाचवता आले नाहीत. ही घटना कालाहंडीमधील गोलामुंडा ब्लॉकच्या सियालजोडी गावात घडली.

पत्नीच्या मृत्यूमुळे मोठा धक्का;

पत्नीच्या अंत्यविधीच्या चितामध्ये उडी मारली त्या गृहस्थाचे नाव निलमणी साबर आहे. पत्नी रायबरी यांच्या निधनाने नीलामणी यांना मोठा धक्का बसला होता. त्यामुळे ते खूप दुःखी होते. असे सांगण्यात येत आहे.

पत्नीच्या मृत्यूचे दुःख; जळत्या चितेवर पतीने मारली उडी!
सोलापुरच्या शेतकऱ्याची अजब डिमांड; गांजाची लागवड करू द्या अन्यथा...

नेमके काय झाले?

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पत्नीच्या चितेला आग लावल्यानंतर नीलामणी हे तिथे बसलेले होते. स्मशानभूमीत आलेले लोक जवळच्या तलावात अंघोळ करायला गेले. दरम्यान, नीलमने यांनी आपल्या पत्नीच्या चितेत उडी मारली.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com