Viral Video : वाचवा रे, बसचालक किडनॅप करत आहे... बसमध्येच पुणेकरानं ठोकली आरोळी अन्...

हा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Pune Viral News
Pune Viral NewsSaam Tv
Published On

Pune Latest News : पुणे (Pune) तिथं काय उणे अस नेहमीच म्हटलं जातं. त्याचा प्रत्येय पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळाला आहे. पुणे महानगर परिवहन मंडळ अर्थात पीएमपीएल (PMPL) बस चालक आणि प्रवाशाच्या भांडणाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. (Pune Viral Video)

Pune Viral News
Pune : चिंता वाढवणारी बातमी! पुण्यात 1 नोव्हेंबरपासून CNG मिळणार नाही?

या व्हिडियोमध्ये एक तरुण मला माझ्या ऑफिस समोर सोडा म्हणून ड्रायव्हर केबिनमध्ये जोरा - जोरात आरडाओरडा करत आहे. बस थांबा निघून गेल्यानंतर प्रवाशाने बस थांबवण्यासाठी सांगितली. त्याला उतरण्यासाठी ड्रायव्हरने नकार दिल्यानंतर या तरूणाने मोठ्याने बोंब ठोकायला सुरूवात केली. एवढंच नाही तर प्रवाशाने अरेरावी केली. त्यामुळे बस चालकाने बसचे दार लॉक केले.

या प्रवाशाला उतरता आले नाही म्हणून प्रवाशाने चक्क बोंब मारत वाचवा रे वाचवा... मला वाचवा....ड्रायव्हर मला किडनॅप करत आहे... अशा प्रकारचा आरडाओरडा करताना हा तरुण या व्हिडिओमध्ये दिसत आहे. चिंचवड वरून बालेवाडी कडे जाणाऱ्या बस मध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे.

व्हायरल होत असेलला हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. फक्त बसमधून उतरवण्यास मनाई केल्यामुळे या तरुणाने बसीमध्येच अरोडाओरड सुरु केली. हा व्हिडिओ सध्या प्रचंड शेअर केला जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com