Pune : चिंता वाढवणारी बातमी! पुण्यात 1 नोव्हेंबरपासून CNG मिळणार नाही?

या संपाचा फटका पुणेकरा सहन करावं लागणार आहे.
CNG
CNGSaam Tv
Published On

Pune News : पुणेकरांसाठी चिंतेची बातमी आहे. कारण पुण्यात (Pune) अनिश्चित काळासाठी CNG पंप बंद राहणार आहेत. पेट्रोल डिलर असोसिएशनच्या वतीने 1 नोव्हेंबरपासून संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संपाचा फटका पुणेकरा सहन करावं लागणार आहे. येत्या 20 ऑक्टोबरपासून हा संप सुरु होणार होता. मात्र आता दिवाळीचे कारण सांगत हा संप पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे आता 1 नोव्हेंबर पासून पुण्यात अनिश्चित काळासाठी CNG पंप बंद राहणार आहेत. (Pune Latest News In Marathi)

CNG
ठाण्यातील 'त्या' रिक्षाचालकाला अटक, मुलीला रिक्षाने नेलं हाेते फरफटत; पाहा व्हिडिओ

विलंबित थकबाकी आणि व्याजासह डीलर्सच्या खात्यात कमिशन जोपर्यंत जमा होत नाही, तोपर्यंत सीएनजी विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संपामुळे मात्र पुणेकरांचे हाल होणार आहे. त्यामुळे आता सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांच्या वाहतुकीचं काय होणार, असा प्रश्न पुणेकरांच्या वतीने उपस्थित केला जात आहे. दरम्यान, संप आधीच यावर काही तोडगा काढण्याचीही गरज पुणेकरांच्या वतीने व्यक्त केली जात आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्याने वाहनधारकांनी आपला कल सीएनजी गाड्यांकडे वळवला आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणावर सीएनजीवर चालणारी वाहनं असल्याने सीएनजी गॅसची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे.मात्र आता पेट्रोल डिलर असोसिएशनच्या वतीने घेतलेल्या या निर्णयाचा पुणेकरांना त्रास सहन करावा लागणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com