Pune Traffic : पुणेकरांची कोंडी फुटणार! आणखी एक उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरु होणार; वाचा सविस्तर...

Pune Traffic Update : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (PMRDA) येथे उभारण्यात येत असलेल्या दुहेरी उड्डाणपुलाच्या एका बाजूचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे.
Pune Traffic Update
Pune Traffic Update Saam Tv News
Published On

पुणे : पुणे शहरातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक परिसरातील तीव्र वाहतूक कोंडी लवकरच काही प्रमाणात सुटण्याची लक्षणे दिसत आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (PMRDA) येथे उभारण्यात येत असलेल्या दुहेरी उड्डाणपुलाच्या एका बाजूचे काम अंतिम टप्प्यात आलं असून, ही बाजू मे महिन्याच्या अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुली होण्याची शक्यता आहे.

या उड्डाणपुलाच्या औंधकडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या मार्गीकेचे बहुतांश बांधकाम पूर्ण झालं आहे. पीएमआरडीएचे मुख्य अभियंता, रिनाज पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बाजूला आता प्रामुख्याने गर्डर टाकणं, रॅम्प्सचे काम करणं आणि डांबरीकरण करणं शिल्लक आहे. तसेच, दोन स्पॅन्सचे काँक्रीटीकरण बाकी आहे. ही सर्व कामे वेळेत पूर्ण करून ३१ मे पर्यंत ही मार्गिका वाहतुकीसाठी खुलीं करण्याचा पीएमआरडीएचा ध्येय आहे.

Pune Traffic Update
Pahalgam Attack : उट्ट काढण्याची संधी, नकाशावरून सगळं संपवूनच टाकू; प्रसिद्ध अभिनेत्याची पाकिस्तानविरोधात डरकाळी

या एका बाजूचं काम पूर्ण झाल्यावर शिवाजीनगरकडून औंधकडे जाणाऱ्या दुसऱ्या मार्गिकेच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. एकूण चार रॅम्प्सचे काम नंतरच्या टप्प्यात पूर्ण केलं जाईल. संपूर्ण प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्राधिकरणाचा प्रयत्न असल्याचं पठाण यांनी सांगितले. यामुळे विद्यापीठ चौकातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल.

शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्ग तीनचा भाग असलेला हा एकात्मिक दुहेरी उड्डाणपूल महत्त्वपूर्ण आहे. याची एकूण लांबी १.७ किलोमीटर असून रुंदी २२.२ मीटर आहे. हा ‘कंपोझिट फ्लायओव्हर’ प्रकारचा पूल आहे. या प्रकल्पाला औंध, बाणेर, पाषाण आणि सेनापती बापट रस्त्याकडे उतरण्यासाठी रॅम्प्सची सोय आहे. तसेच, गणेशखिंड रस्त्यावरून जाणाऱ्या पाणीपुरवठा वाहिनीची व्यवस्थाही यात करण्यात आली आहे.

Pune Traffic Update
Crime: NEETच्या परीक्षेची तयारी अन् विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्कार, अश्लील VIDEO काढला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com