Pune Traffic: पुणेकरांनो लक्ष द्या! रमझान ईदनिमित्त शहरातील वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Ramadan Eid Pune Traffic : हडपसरकडून गोळीबार मैदानमार्गे स्वारगेटकडे जाणारा रस्ता आणि कोंढव्यातून पुलगेटला जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून, वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
Pune Traffic: पुणेकरांनो लक्ष द्या! रमझान ईदनिमित्त शहरातील वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Ramadan Eid Pune Traffic Route :

पुण्यात आज रमझान ईदनिमित्त गोळीबार मैदान परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आलेत. रमझान ईदनिमित्त गोळीबार मैदान येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे या परिसरात आज सकाळी सहा ते नमाज पठण होईपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. (Latest News)

आज रमझान ईदनिमित्त शहरातील १४१ मशिदीत नमाज पठण होणार आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आलाय. गोळीबार मैदान, हडपसर, पर्वती दर्शन आणि खडकी येथील ईदगाह मैदानांसह १४१ मशिदीत नमाज पठण होणार आहेत. सकाळी ७ ते ११.३० या कालावधीत नमाज पठण करण्यात येणार आहे, अशी माहिती रविवार पेठेतील हिलाल कमिटीकडून (चाँद कमिटी) देण्यात आली.

पुण्यातील गोळीबार मैदान परिसरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी मोठ्या संख्येने येतात. या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. रमझान ईदनिमित्त हडपसरकडून गोळीबार मैदानमार्गे स्वारगेटकडे जाणारा रस्ता आणि कोंढव्यातून पुलगेटला जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. गोळीबार मैदान चौकातून स्वारगेटकडे जाणारा मार्ग बंद राहील. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवहान वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलंय.

आज गोळीबार मैदान चौकातून स्वारगेटकडे जाणारा मार्ग बंद राहील. गोळीबार चौकातून डावीकडे वळून सी.डी.ओ.चौकापुढे उजवीकडे वळून गिरिधर भवन चौक- उजवीकडे वळून सेव्हन लव्हज चौकातून इच्छित स्थळी जाता येणार आहे.

सीडीओ चौक ते गोळीबार मैदान चौकाकडे येणारी वाहतूक बंद.

पर्यायी मार्ग - लुल्लानगरकडून खाण्या मारुती चौकाकडे जाणारी वाहतूक खटाव बंगला चौक- नेपियर रस्ता- मम्मादेवी चौक किंवा वानवडी बाजार चौक- भैरोबानाला येथून किंवा गिरीधर भवन चौकातून इच्छित स्थळी जाता येईल.

सेव्हन लव्हज चौकाकडून गोळीबार मैदानाकडे येणारी वाहतूक बंद

पर्यायी मार्ग- सॅलिसबरी पार्क - सी.डी.ओ. चौक - भैरोबानाला येथून इच्छित स्थळी जाता येणार. सोलापूर रस्त्याने मम्मादेवी चौकाकडे येणाऱ्या वाहनांना गोळीबार मैदानाकडे जाता येणार नाही. याचा पर्यायी मार्ग वाहने मम्मादेवी चौक, बिशप स्कूलमार्गे किंवा कमांड हॉस्पिटलमार्गे वळून पुढे किंवा नेपियर रस्त्याने तुमच्या इच्छित स्थळी जाता येईल.

भैरोबानाला ते गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक भैरोबानाला येथून वळविण्यात आलीय.

भैरोबानाला ते एम्प्रेसगार्डन मार्गे किंवा लुल्लानगरमार्गे वाहतूक सोडण्यात आलीय. कोंढवा परिसरातून गोळीबार मैदानाकडे येणाऱ्या सर्व जड,अवजड मालवाहतूक वाहने, प्रवासी आणि पीएमपी बसेस यांना प्रवेश बंद ठेवण्यात आल्यात. यामुळे लुल्लानगर चौकातून भैरोबानाला चौक किंवा गंगाधाम चौकातून इच्छित स्थळी जाता येणार आहे.

याशिवाय कोंढवा आणि शहरातील इतर भागातील ईदगाह मैदानावर नमाज पठण होणार आहे. त्या भागातील वाहतूक परिस्थितीनुसार वळविण्यात येणार आहे. याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.

Pune Traffic: पुणेकरांनो लक्ष द्या! रमझान ईदनिमित्त शहरातील वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?
Pune Police: तृतीयपंथींना यापुढे सिग्नलवर पैसे मागता येणार नाही, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com