Traffic Update : पुण्यात गणपती विसर्जनादिवशी वाहतुकीत मोठा बदल! महत्त्वाचे रस्ते राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग कोणते?

Pune Traffic Police Update News : पुण्यात २५ सप्टेंबरला गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे सकाळी ९ वाजल्यापासून अनेक प्रमुख रस्ते बंद राहणार. वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि महत्त्वाच्या सूचना जाणून घ्या.
Pune Ganesh Visarjan 2026 Traffic Diversions & Road Closures
Pune Ganesh Visarjan 2026 Traffic Diversions & Road ClosuresAI Image
Published On
Summary
  • पुण्यात वाहतुकीत मोठा बदल

  • गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर २५ सप्टेंबरला वाहतुकीत बदल

  • पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

पुणे शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, मिरवणुकीदरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पुणे पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून गणेश विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत शहराच्या मध्यवर्ती भागातील अनेक प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सुरुवात होणार आहे. मिरवणुकीच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या दिवशी मध्यवर्ती पुण्यातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Pune Ganesh Visarjan 2026 Traffic Diversions & Road Closures
Mumbai : मुंबईत महिलेचा दारू पिऊन धिंगाणा, बंदोबस्ताला असलेल्या पोलिसाच्या हाताचा घेतला चावा

विसर्जनादिवशी म्हणजेच २५ सप्टेंबर रोजी खालील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी छत्रपती शिवाजी रस्ता,लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, कर्वे रोड, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, गुरुनानक रस्ता बंद राहणार आहेत. याशिवाय गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील इतर रस्त्यांवरही आवश्यकतेनुसार वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड, टिळक रोड, गणेश रोड आणि केळकर रोड परिसरात मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.

Pune Ganesh Visarjan 2026 Traffic Diversions & Road Closures
Shocking : मोठी बातमी! भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता, बॅडमिंटन खेळण्यासाठी बाहेर पडला पण घरी परतलाच नाही

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी शक्यतो मध्यवर्ती पुण्यात वाहन घेऊन जाणे टाळावे. अत्यावश्यक प्रवास असल्यास पोलिसांनी निश्चित केलेले डायव्हर्शन पॉईंट, रिंगरोड आणि पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नो-पार्किंग क्षेत्रांमध्ये वाहने उभी करू नयेत. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी येणाऱ्या नागरिकांनी अधिकृत पार्किंगच्या ठिकाणीच वाहने पार्क करावीत. वाहतूक नियोजनाची माहिती घेऊनच घराबाहेर पडावे, असे पुणे पोलिसांनी सांगितले आहे. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून मिरवणूक पूर्ण होईपर्यंत संबंधित रस्ते बंद राहणार असल्याने नागरिकांनी वाहतूक बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com