Pune Traffic: गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीत मोठे बदल; शहरातील मध्यवर्ती भागात जड वाहतूक बंद

Pune Traffic Changes: पुणे पोलिसांनी गणेशोत्सव २०२४ दरम्यान २५ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुरळीत हालचालीसाठी शहराच्या मध्यभागी जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
Pune Traffic: गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीत मोठे बदल; शहरातील मध्यवर्ती भागात जड वाहतूक बंद
Published On
Summary
  • गणेशोत्सव काळात पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल केले गेले.

  • मध्यवर्ती भागात जड/अवजड वाहनांची वाहतूक बंद राहणार.

  • अत्यावश्यक सेवेतील वाहनांना मात्र सूट देण्यात आली आहे.

  • निर्णय नागरिकांच्या सुरक्षेसाठी व गर्दी टाळण्यासाठी घेण्यात आला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात शहरात नागरिकांची मोठी रेलचेल असते. साहित्य खरेदी व देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. सुरक्षेच्या कारणास्तव पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आली आहेत. शहरातील मध्यवर्ती भागात जड वाहतूक बंद करण्यात आलीय.

गणेशोत्सव २५ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान साजरा केला जाणार आहे. या काळात पुणे शहरात भाविकांची मोठी वर्दळ असते. सुरक्षेची उपाययोजना व रस्त्यांवरून धावणाऱ्या जड/अवजड वाहनांमुळे नागरिकांना असुरक्षितता निर्माण होवून त्यांचे जीवितास धोका होवू नये. तसेच शहरातील खालील ठिकाणी वाहतुक सुरक्षित व सुरळीतपणे राहण्यासाठी पोलीस उप आयुक्त, वाहतुक शाखा पुणे शहर, हिंमत जाधव यांनी अत्यावश्यक सेवेतील वाहने म्हणजेच फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका, गणेश देखावे वाहतूक करणारी वाहने वगळून खालीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.

25 ऑगस्ट ते 07 सप्टेंबर 2025 पर्यंत पुढील नमुद रस्त्यांवर जड / अवजड वाहनांच्या वाहतूकीस 24 तास बंदी करण्यात आली आहे. शास्त्री रोड - सेनादत्त चौकी चौक ते अलका चौक, टिळक रोड - जेधे चौक ते अलका चौक, कुमठेकर रोड - शनिपार ते अलका चौक, लक्ष्मी रोड - संत कबीर चौक ते अलका चौक, केळकर रोड - फुटका बुरुज ते अलका चौक, बाजीराव रोड - पुरम चौक ते गाडगीळ पुतळा, शिवाजी रोड - गाडगीळ पुतळा ते जेधे चौक, कर्वे रोड - नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक,

Pune Traffic: गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीत मोठे बदल; शहरातील मध्यवर्ती भागात जड वाहतूक बंद
Mumbai Traffic: गणेशोत्सवादरम्यान वाहतुकीत मोठा बदल; अशी असणार मुंबई-पुण्याची वाहतूक व्यवस्था

फर्ग्युसन कॉलेज रोड - खंडोजीबाबा चौक ते विर चाफेकर चौक, जंगली महाराज रोड - स.गो. बर्वे चौक ते खंडोजीबाबा चौक, सिंहगड रोड - राजाराम ब्रिज ते सावरकर चौक, गणेश रोड / मुदलियार रोड – पॉवरहाऊस – दारुवाला - जिजामाता चौक - फुटका बुरुज चौक या प्रमाणे करण्यात आलेल्या वाहतुक बदलांचा अवलंब करून गणेशोत्सव शांततेने पार पाळण्यास व वाहतुक सुरळीत ठेवण्यास पुणे शहर वाहतुक पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस उप आयुक्त, वाहतुक शाखा पुणे शहर, हिंमत जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Pune Traffic: गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीत मोठे बदल; शहरातील मध्यवर्ती भागात जड वाहतूक बंद
Pune: गणेशोत्सवात पुण्यात ७००० पोलिस तैनात, एआय कॅमेऱ्याची असणार नजर; २७ ऑगस्ट अन् ६ सप्टेंबर 'ड्राय डे' घोषित

गणेश प्रतिष्ठापना म्हणजेच बुधवारी शिवाजी रोड वरील गाडगीळ पुतळा चौक ते गोतीराम भैय्या चौक वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. फडके हौद चौक ते जिजामाता चौक, फुटका बुरूज तसेच अप्‍पा बळवंत चौक ते बुधवार चौक, मोती चौक त्याच बरोबर मंगला टॉकीज समोरील रस्ता बंद करण्यात आलाय.

शिवाजीनगर बसस्‍थानकावरून शिवाजी रस्‍त्‍याने स्‍वारगेटला जाणाऱ्या बस या स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्‍ता आणि टिळक रस्‍त्‍याने स्‍वारगेटला जातील. मनपा बसस्‍थानकावरून स्‍वारगेटला जाणाऱ्या बस या जंगली महाराज रस्‍ता, अलका टॉकीज चौक, टिळक रस्‍ता, शास्‍त्री रस्‍त्याने स्‍वारगेटला जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com