अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी
पुणे : पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र गजबज पाहायला मिळत आहे. पुण्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळाबाहेर गणरायांच्या दर्शनासाठी भक्तांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. पुण्यातील गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाने मंगळवारी गणेश विसर्जन आणि मिरवणुकीची तयारी केली आहे. या दिवसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शहरातील प्रमुख रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
पुण्यात विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी लक्ष्मी रोड, टिळक रोडसह शहरातील प्रमुख रस्ते बंद केले आहेत. लक्ष्मी रोड, टिळक रोड, केळकर रोड, बाजीराव रोड यासह प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. मंगळवारी सकाळी ७ वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत रस्ते बंद राहणार आहे.
पुण्यात सकाळी ९ वाजल्यापासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. अनेक रस्त्यावर नो पार्किंग तर अनेक मार्ग एकेरी होणार आहेत. तर पुण्यात विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी प्रमुख रस्ते बंद राहणार आहेत. त्यामध्ये लक्ष्मी रोड, टिळक यासह इतर प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे.
विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी बंद असणारे प्रमुख रस्ते
लक्ष्मी रोड
टिळक रोड
कुमठेकर रोड
केळकर रोड
जंगली महाराज रोड
एफ सी रोड
कर्वे रोड
प्रभात रोड
शिवाजी रोड
यंदा गणेशोत्सवात घातक लेझर झोतांचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच मिरवणुकीत लेझर दिव्यांचा वापर करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. लेझर झोतांसाठी साहित्य पुरविणाऱ्या विरुद्ध देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांविरुद्ध कारवाईचा बडगा पोलिसांनी उगारला आहे. लोहगाव परिसरात हवाई दलाचा तळ, नागरी विमानतळ आहे. लेझर झोतांमुळे वैमानिकांचे डोळे दिपून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूण साठ दिवस लेझर झोतांवर बंदीचा आदेश सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.