Accident News : नजर हटी दुर्घटना घटी! सिंहगड घाटात ट्रकचा भीषण अपघात, वाहनाचा चक्काचूर
Pune Accident NewsSaam Tv

Accident News : नजर हटी दुर्घटना घटी! सिंहगड घाटात ट्रकचा भीषण अपघात, वाहनाचा चक्काचूर

Pune Accident News : पुण्यातील सिंहगड घाटात रविवारी भीषण अपघात झाला. ट्रक दरीत कोसळल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने चालक थोडक्यात बचावला. या घटनेनंतर पर्यटकांसाठी सिंहगड घाट मार्ग असुरक्षित ठरत आहे.
Published on
Summary
  • पुण्यातील सिंहगड घाटात ट्रक दरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे

  • सुदैवाने चालक थोडक्यात बचावला आहे

  • या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले

  • धोकादायक वळणावर अपघात झाल्याने पर्यटकांसाठी मार्ग असुरक्षित झाला आहे

पुण्यातील सिंहगड घाटात मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. शहरातील सिंहगड घाटात ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी घाटात कोसळली. या अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र दैव बलवत्तर म्हणून या मोठ्या अपघातात चालकाचा जीव वाचला आहे. दरम्यान पर्यटकांसाठी हा घाट मार्ग आता असुरक्षित झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या सिंहगड घाटातुन सर्वात धोकादायक वळणावरुन रविवारी दुपारच्या सुमारास मालवाहक ट्रक जात होता. या ट्रकच्या चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने मालवाहतूक करणारा आयशर ट्रक येथील ११ हजार पॉइंट वरून खोल दरीत कोसळला. हा अपघात इतका भीषण होता की आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.

Accident News : नजर हटी दुर्घटना घटी! सिंहगड घाटात ट्रकचा भीषण अपघात, वाहनाचा चक्काचूर
Metro Viral Reel : मेट्रोमध्ये तरुणीची रिलबाजी, नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप; Viral Video

या घटनेनंतर घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघात झालेल्या ट्रक चालकाला बाहेर काढण्यात आलं. सुदैवाने या दुर्घटनेत चालक बचावला असून मोठ्याप्रमाणावर वित्त हानी झाली आहे. पोलिसांना नागरिकांच्या मदतीने ट्रक दरीतून बाहेर काढण्यात यश आलं आहे.

Accident News : नजर हटी दुर्घटना घटी! सिंहगड घाटात ट्रकचा भीषण अपघात, वाहनाचा चक्काचूर
Maharashtra Cough Syrup Alert : यवतमाळ हादरलं! विषारी कफ सिरपमुळे ६ वर्षीय मुलाचा मृत्यू, परिसरात संतापाची लाट

अपघातग्रस्त ट्र्क चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान सिंहगड घाट वर्दळीचा आहे. इथे पर्यटकांची नेहमी गर्दी असते. सिंहगड घाटातुन क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांकडुन सिंहगड घाटरस्ता वापरण्याची शक्कल लढवली जाऊ लागल्याने पर्यटकांसाठी हा घाट मार्ग आता असुरक्षित ठरू लागला आहे. परिवहन विभाग व पोलिसांकडून याप्रकरणी कोणते नवे पाऊल उचलले जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com