Pune: सिंहगड उड्डाणपूल ६६ ठिकाणी फोडणार, पुण्यातील वाहतूक कोंडी वाढणार; नेमका फटका कुणाला बसणार?

Pune Sinhagad Road Flyover: पुण्यातील सिंहगडरोडवर उड्डाणपूल झाला असला तरी याठिकाणी वाहतूक कोंडी होणार आहे. कारण मेट्रोच्या कामासाठी सिंहगड उड्डाणपूल ६६ ठिकाणी फोडण्यात येणार आहे.
Pune: सिंहगड उड्डाणपूल ६६ ठिकाणी फोडणार, पुण्यातील वाहतूक कोंडी वाढणार; नेमका फटका कुणाला बसणार?
Pune Sinhagad Road FlyoverSaam Tv
Published On

Summary -

  • नव्या मेट्रो मार्गासाठी सिंहगड उड्डाणपूल ६६ ठिकाणी फोडण्यात येणार

  • उड्डाणपूल अरुंद झाल्यानंतर वाहतूक कोंडी पुन्हा वाढणार

  • वडगाव, धायरी, नऱ्हे, खडकवासला येथील नागरिकांना मोठा फटका बसणार

  • ११८ कोटी खर्चून बांधलेला पूल पुन्हा तोडावा लागत असल्याने पुणेकर नाराज

सचिन जाधव, पुणे

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणेकरांना पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. कारण पुण्यातील नव्याने झालेला सिंहगड रोडवरचा उड्डाणपूल ६६ ठिकाणी फोडण्यात येणार आहे. नव्याने मंजूर झालेल्या मेट्रो मार्गासाठी सिंहगड रोडवरचा हा उड्डाणपूल फोडण्याचा प्रस्ताव आहे. ६६ ठिकाणी या पुलाला फोडण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे आता पुण्यात पुन्हा वाहतूक कोंडी होऊन पुणेकरांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. हा उड्डाणपूल फोडल्यानंतर कोणत्या परिसरातील नागरिकांना सर्वात जास्त फटका बसणार हे आपण जाणून घेणार आहोत...

केंद्र सरकारने नुकताच खडकवासला ते हडपसर-खराडी आणि नळस्टॉप ते माणिकबाग या ३२ किलोमीटर लांबीच्या आणि ९८५८ कोटी रुपये खर्चाच्या नवीन मेट्रो मार्गाला मंजुरी दिली. काही दिवसांपूर्वीच सिंहगड रस्त्यावरील कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून ११८ कोटी रुपये खर्च करून हा नवा उड्डाण पूल बांधण्यात आला होता. वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटल्यामुळे पुणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पण आता हा उड्डाण पूल मेट्रोच्या कामासाठी अनेक ठिकाणी फोडण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांना पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.

Pune: सिंहगड उड्डाणपूल ६६ ठिकाणी फोडणार, पुण्यातील वाहतूक कोंडी वाढणार; नेमका फटका कुणाला बसणार?
Pune Metro: पुण्याची मेट्रो सुसाट! चांदणी चौकापर्यंत पोहचणार; १३ स्थानकांसाठी ३६२४ कोटी रुपये मंजूर

सिंहगड रोडवरचा हा उड्डाणपूल बांधताना मेट्रोच्या खांबांची जागा निश्चित केली असून मेट्रोचे खांब उभारण्यासाठी ६६ ठिकाणी उड्डाणपुलाला छेद दिला जाणार आहे. त्यामुळे उड्डाण पुलाची रुंदी जवळपास प्रत्येकी दोन मीटरने कमी होईल, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. या नव्या मेट्रोच्या कामामुळे उड्डाणपूल अरुंद होणार असून याचा फटका आता सिंहगड रोडवरील वाहतुकीला बसणार आहे. तर मेट्रोचा विचार करून या उड्डाण पुलाची रुंदी जास्त ठेवण्यात आली असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.

Pune: सिंहगड उड्डाणपूल ६६ ठिकाणी फोडणार, पुण्यातील वाहतूक कोंडी वाढणार; नेमका फटका कुणाला बसणार?
Pune Metro : पुणे मेट्रो सुसाट! २४ तासांत तब्बल ६ लाख जणांचा प्रवास, गणेशोत्सवात मेट्रोची कोट्यवधींची कमाई

दरम्यान, सिंहगड रोड, वडगाव, धायरी, नऱ्हे, किरकटवाडी, नांदेड सिटी, खडकवासला कडे जाणाऱ्या नागरिकांना या उड्डाणपुलाचा फायदा झाला होता. गेली अनेक वर्षे सिंहगड रोडवरील वाहतूक कोंडी सुटत नव्हती मात्र हा उड्डाणपूल सुरू झाल्याने काहीसा दिलासा त्या भागातील नागरिकांना मिळाला होता. पण आता नव्याने मेट्रोचे काम सुरू होत असताना परत एकदा या उड्डाणपुलाची तोडफोड केली जाणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने शहरात येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी परत वाढणार आहे. प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना बसणार आहे. त्यामुळे आता हडपसर- खराडी- खडकवासला मेट्रो होत असताना पुन्हा वाहतूक कोंडी होणार आहे.

Pune: सिंहगड उड्डाणपूल ६६ ठिकाणी फोडणार, पुण्यातील वाहतूक कोंडी वाढणार; नेमका फटका कुणाला बसणार?
Pune Police : वाहतूक कोंडीची कटकट मिटवण्यासाठी आयुक्त थेट रस्त्यावर उतरले, विमाननगरमध्ये घेतला आढावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com