Pune Shocking: सात महिन्यांच्या मृत अर्भकाला डबक्यात फेकून आई फरार; पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Shocking News: विमाननगरमधील लेबर कॅम्पमधील डबक्यात ७ महिन्यांच्या अर्भकाचा मृतदेह आढळला. पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतलं असून, या प्रकरणाचा तपास सखोल सुरू आहे.
Pune Crime News
7-month-old baby corpse found in Viman NagarSaam TV News
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही

माणुसकीला काळिमा फासणारी घटना पुण्यातील विमानगर परिसरातून उघडकीस आली आहे. लेबर कॅम्प जवळील स्वच्छतागृहातील डबक्यात ७ महिन्यांच्या स्त्री जातीच्या अर्भकाचा मृतदेह आढळून आला आहे. या परिसरात कार्यरत असलेल्या सुपरवायझर यांनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृत अर्भक ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित महिलेला ताब्यात घेतले असून तिची सखोल चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विमाननगर येथील कोणार्क पार्क फेज १ मध्ये असलेल्या लेबर कॅम्प मध्ये हा प्रकार घडला. मंगळवारी (२५ जून) रोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान, लेबर कॅम्पमधील सुपरवायझर दिग्विजय देसाई स्वच्छतागृहाजवळील डबक्याजवळ गेले. त्यांना तिथे संशयास्पद वस्तू आढळली. जवळ जाऊन पाहिल्यावर त्यात मृत अर्भक असल्याचे लक्षात आले.

Pune Crime News
BJP MLA Crime: भाजप आमदाराकडून बँक मॅनेजरला शिवीगाळ; ऑडिओ क्लिप व्हायरल, नेमकं प्रकरण काय?

दिग्विजय देसाई यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच विमानतळ पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच मृत अर्भक ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी पोलिसांनी विमाननगर परिसरात राहणाऱ्या एका संशयित महिलेला ताब्यात घेतले आहे. सध्या पोलिसांकडून तिची कसून चौकशी सुरू आहे.

Pune Crime News
Gold Rates:ग्राहकांसाठी खुशखबर, सोनं पुन्हा स्वस्त झालं, आजचा २४ आणि २२ कॅरेट सोन्याचा दर किती?

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. पोलिस अधिक तपास करत असून अर्भकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आणि ते डबक्यात का आणि कसे टाकण्यात आले, याचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com