Pune : पुण्यात खळबळ! रस्त्याच्या कडेला आढळलं ५ महिन्यांचं मृत अर्भक

Pune Shocking News : पुण्यातील खेड शिवापूर येथे रस्त्याच्या कडेला एका बेवारस अर्भकाचा मृतदेह आढळल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
pune crime
pune crimex
Published On
Summary
  • पुण्यातल्या खेड शिवापूर येथील शिवाजीनगर परिसरात बेवारस अर्भकाचा मृतदेह आढळला

  • शिंदेवस्तीकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यालगत अंदाजे पाच महिन्यांचे हे अर्भक मृतावस्थेत आढळले.

  • या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन जाधव साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune Shocking : पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील खेड शिवापूर येथील शिवाजीनगर परिसरात बेवारस अर्भकाचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात खेड शिवापूरच्या राजगड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील खेड शिवापूरच्या शिवाजीनगर परिसरामध्ये एका अर्भकाचा मृतदेह आढळून आला. शिंदे वस्तीकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यालगत अंदाजे पाच महिन्यांचे अर्भक मृत अवस्थेमध्ये आढळले. शिवाजीनगर वस्ती येथील आशा सेविका अनिता घोडेकर यांना अर्भक रस्त्याच्या कडेला पडले असल्याची माहिती मिळाली.

pune crime
Pune Crime : पुण्यात भयंकर घटना, नराधम बापाचा पोटच्या मुलीवर ४ महिने अत्याचार; स्थानिकांनी फोडून काढलं

बेवारस अर्भक रस्त्याच्या बाजूला पडले असल्याचे कळताच आशा सेविका अनिता घोडेकर यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा पुरुष जातीचे अंदाजे पाच महिन्यांचे अर्भर मृतावस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. अनिता घोडेकर यांनी याबाबतची संपूर्ण माहिती राजगड पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचाऱ्यांना दिली.

pune crime
Crime : बीडमधील माजी उपसरपंचाचा सोलापुरात संशयास्पद मृत्यू, तक्रारीत नर्तिकेचं नाव; नातेवाईकांना वेगळाच संशय

राजगड ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई आणि अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अर्भकाला ताब्यात घेत खासगी रुग्णालयात नेले. पण तपासणीदरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अर्भक आधीच मृत असल्याचे सांगितले. याप्रकरणी आशा सेविका अनिता घोडेकर यांनी तक्रार दिली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

pune crime
Shocking : ऑनलाइन डेटा चोरी, महिलेचे नग्नावस्थेतील फोटो, व्हिडीओ व्हायरल; कंपनीवर खटला दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com