Pune: बुलेटस्वारांमुळे पुणेकरांची झोप झाली खराब; फटाक्याच्या आवाज करत बाईकस्वार मात्र सुसाट

Pune Residents: बुलेटच्या कर्णकर्कश्श फटाक्याच्या आवाजामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण होते. लहान मुले आणि महिलाही आवाजामुळे दचकतात, ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते.
Pune
Pune saam tv
Published On

पुण्यातील वाघोलीकर बुलेटच्या धडाधड आवाजामुळे त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळी, रस्त्यावर धडधड करत धावणाऱ्या बुलेट्समुळे पादचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः अडचणींना सामोरे जावे लागते. यामुळे वाहतूक पोलिसांकडून या बुलेटबाजांना नियंत्रणात आणण्यासाठी कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी होत आहे. वाघोली परिसरात रात्रीच्या धुडगूसामुळे वातावरण गढले आहे आणि नागरिक शांततेसाठी उपाययोजना करायला हवे अशी भावना व्यक्त करत आहेत.

वाघोली परिसरात गेल्या काही दिवसांपासून बुलेटच्या आवाजाने नागरिक त्रस्त झाले आहेत. आकर्षक असलेल्या या दुचाकींचे सायलेन्सरमध्ये बदल करून टवाळखोर तरुण फटाक्यांचा आवाज काढतात, ज्यामुळे रस्त्याने जाणारे सर्वसामान्य नागरिक, लहान मुले आणि महिलांना घाबरते. अचानक येणारा या आवाजामुळे अपघाताची शक्यता असते.

Pune
Satbara Utara : महसूल विभागाचा मोठा उपक्रम! 'सातबारा' संदर्भात घेतला महत्त्वाचा निर्णय

रात्रीच्या वेळी बुलेट घेऊन तरुणांमध्ये गडबड होऊन शांतता भंग होतो. विशेषतः वाघोली परिसरात ही समस्या तीव्र आहे, जिथे टार्गेट मुलं फटाके फोडतात. अशा बुलेटबाजांमुळे नागरिक सत्तेत असून, पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. पोलीस प्रशासन या बुलेटबाजांना आवर घालण्यात अपयशी ठरत असल्याने नागरिक चिंतित आहेत आणि सुरक्षिततेसाठी उपाययोजना करायला हवीत.

Pune
Badlapur News: बदलापूर पालिकेची थकीत करवसुलीसाठी धडक मोहीम, 121 मालमत्तांवर जप्तीची कारवाई

काही दिवसांपूर्वी पुणे वाहतूक पोलिसांनी बुलेट गाड्यांच्या सायलेन्सरमध्ये मॉडीफिकेशन करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांवर कारवाई केली होती. यामध्ये १७६८ बुलेटच्या सायलेन्सरवर बुलडोजर फिरवण्यात आले होते. तरीही, नागरिकांचा असा मत आहे की, या कारवाईची तीव्रता वाढवून अशा बुलेटबाजांवर कठोर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी पोलिसांकडून आणखी कडक उपायांची मागणी केली आहे.

Pune
Dharashiv Political Crisis : धाराशिवमधील १२ सरपंच आणि ५०० ग्रामपंचायत सदस्य अपात्र, नेमकी चूक काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com