Pune : पुणे पोलीस भिकारी आणि बेघर व्यक्तींना तुरुंगात का टाकत आहे? १५ दिवसांत ४२ जणांना कारगृहात डांबलं

Pune News : पुणे रेल्वे स्थानक परिसरात आरपीएफ आणि जीआरपीच्या संयुक्त मोहिमेत १५ दिवसांत ४२ भिकारी व बेघर व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. न्यायालयीन आदेशानंतर सर्वांना येरवडा कारागृहात पाठवण्यात आले.
PUNE RAILWAY STATION SPECIAL DRIVE: 42 BEGGARS AND HOMELESS PERSONS DETAINED BY RPF-GRP
PUNE RAILWAY STATION SPECIAL DRIVE: 42 BEGGARS AND HOMELESS PERSONS DETAINED BY RPF-GRPSaam Tv
Published On
Summary
  • पुणे रेल्वे स्थानकात आरपीएफ आणि जीआरपीची संयुक्त विशेष मोहीम

  • १५ दिवसांत एकूण ४२ भिकारी व बेघर व्यक्तींवर कारवाई

  • न्यायालयीन आदेशानंतर सर्वांना येरवडा कारागृहात पाठवले.

  • स्टेशन परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि शिस्तबद्ध ठेवण्यासाठी ही कारवाई

सागर आव्हाड, पुणे

पुणे रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता, सुरक्षा आणि प्रवाशांसाठी अधिक चांगले वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि शासकीय रेल्वे पोलीस (जीआरपी) यांनी संयुक्तपणे विशेष मोहीम राबवली. या मोहिमेद्वारे स्थानक परिसर, फलाट आणि प्रवासी वर्दळीच्या भागांमध्ये फिरणाऱ्या भिकारी तसेच बेघर व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत हालचालींवर नियंत्रण आणण्यास मदत होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

RPF आणि GRP च्या संयुक्त पथकाने गेल्या १५ दिवसांत टप्प्याटप्प्याने ही मोहीम राबवली. या कालावधीत एकूण ४२ भिकारी व बेघर व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. अधिकृत माहितीनुसार, २५ मे रोजी ४ जण, २९ मे रोजी २६ जण आणि ६ जून २०२६ रोजी १२ जण अशा एकूण ४२ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना सक्षम न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

PUNE RAILWAY STATION SPECIAL DRIVE: 42 BEGGARS AND HOMELESS PERSONS DETAINED BY RPF-GRP
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणर? तारीख आली समोर

न्यायालयीन सुनावणीनंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार संबंधित सर्व व्यक्तींची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले की, स्थानक परिसरात भिक मागणे, प्रवाशांना त्रास देणे किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कृत्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

PUNE RAILWAY STATION SPECIAL DRIVE: 42 BEGGARS AND HOMELESS PERSONS DETAINED BY RPF-GRP
Gold Rate Today : सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचा भाव काय ? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

पुणे रेल्वे स्थानक हे राज्यातील महत्त्वाच्या आणि सर्वाधिक वर्दळीच्या स्थानकांपैकी एक मानले जाते. दररोज हजारो प्रवासी या स्थानकाचा वापर करतात. त्यामुळे स्थानक परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि प्रवाशांसाठी अनुकूल ठेवणे आवश्यक आहे. याच उद्देशाने आरपीएफ आणि जीआरपीने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत अशा प्रकारच्या मोहिमा भविष्यातही नियमितपणे राबवल्या जाणार आहेत. अनधिकृत कृत्ये, भिक मागणे तसेच प्रवाशांना त्रास देणाऱ्या घटकांवर लक्ष ठेवून आवश्यक ती कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसर अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि शिस्तबद्ध ठेवण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com