Pune Railway News: पुणे रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना दणका; महिनाभरात तब्बल 'इतक्या' कोटींचा दंड वसूल

Railway Ticket Fine: पुणे रेल्वे विभागाने फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या महिनाभरात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून कोट्यवधींचा दंड वसूल केलाय.
Pune Railway Latest Marathi News
Pune Railway Latest Marathi News Saam TV
Published On

Pune Railway Latest Marathi News

मागील काही महिन्यांपासून रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पैसे वाचवण्यासाठी अनेकजण तिकीटच काढत नसल्याचं समोर आलं आहे. हीच बाब लक्षात घेता पुणे रेल्वे विभागाने फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या महिनाभरात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून कोट्यवधींचा दंड वसूल केलाय. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Railway Latest Marathi News
Weather Forecast: राज्यात विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाचा इशारा; विदर्भ-मराठवाड्याला अलर्ट, वाचा वेदर रिपोर्ट

पुणे रेल्वे स्थानकावर देशभरातून हजारो प्रवासी येत असतात. परंतु काहीजण पैसे वाचवण्यासाठी तिकीट काढत नाही. अशातच पुणे रेल्वे विभागाने (Pune Railway) फेब्रुवारी महिन्यात २२ हजारांहून अधिक फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून रेल्वेने दररोज सरासरी ६ लाखांच्या दंडाची रक्कम वसूल केली आहे. पुणे रेल्वेकडून आतापर्यंत एका महिन्यात वसूल करण्यात आलेला हा सर्वाधिक दंड असल्याचे समोर आले आहे. या अगोदर एक महिन्यात एवढी मोठ्या प्रमाणावर दंडाची रक्कम कधीही वसूल झालेली नव्हती.(Latest Marathi News)

जानेवारी महिन्यात देखील पुणे रेल्वे विभागात तिकीट तपासणीदरम्यान १९ हजार ८५९ प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळून आले होते. त्यांच्याकडून १ कोटी २६ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला होता. तसेच ७ हजारांहून अधिक प्रवाशांना अनियमित प्रवासासाठी ४५ लाख ७५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता.

दरम्यान, सध्या तिकीट कन्फर्म झालेल्या प्रवाशांनीच रेल्वेने प्रवास करावा, तिकीट तपासणीदरम्यान विनातिकीट प्रवासी आढळून आल्यास त्यावर कठोरात कठोर कारवाई करून दंड वसूल केला जाईल, असा इशारा पुणे रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Pune Railway Latest Marathi News
Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीसांवर गुन्हा दाखल केलाच पाहिजे; शिवसेना ठाकरे गटाची आक्रमक भूमिका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com