Pune Bus Fire : पुण्यात अग्नितांडव! २० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसने घेतला पेट, नेमकं काय घडलं?

Pune News : पुण्यात नगर-पुणे महामार्गावर धावत्या बसला अचानक आग लागली. बॅटरी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत चालकाच्या प्रसंगावधानामुळे १५ ते २० कर्मचारी सुखरूप वाचले.
Pune Bus Fire : पुण्यात अग्नितांडव! २० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसने घेतला पेट, नेमकं काय घडलं?
Pune News Saam Tv
Published On
Summary

पुण्यात नगर-पुणे महामार्गावर धावत्या बसला आग लागली

बॅटरी शॉर्टसर्किटमुळे आग लागली

चालकाच्या तत्परतेमुळे १५ ते २० प्रवाशांचे जीव वाचले

अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं

अक्षय बडवे, पुणे

पुण्यात काल संध्याकाळच्या सुमारास अग्नितांडव पाहायला मिळाला. रांजणगाव वरून पुण्याच्या दिशेने नगर पुणे हायवे वरून जात असताना खासगी बसने अचानक पेट घेतल्याने आग लागली. ही बस कंपनीची असल्यामुळे त्यात कंपनीचे १५ ते २० कर्मचारी प्रवास करत होते वाहन चालकाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असल्याचे वृत्त मिळाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास मौजे कोरेगाव भीमा येथे वाहन क्रमांक MH 12 VF 6226 ही खाजगी बस रांजणगाव वरून पुण्याच्या दिशेने निघाली. दरम्यान ही बस नगर पुणे हायवे वरून जात असताना या बसमध्ये असलेल्या बॅटरीचे शॉर्टसर्किट झाले. या शॉर्टसर्किटमुळे बसने पेट घ्यायला सुरुवात केली. धावत्या बसने पेट घ्यायला सुरुवात केल्यानंतर बस चालकाच्या ही गोष्ट निदर्शनास आल्याने त्याने बस बाजूला लावली.

Pune Bus Fire : पुण्यात अग्नितांडव! २० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसने घेतला पेट, नेमकं काय घडलं?
Samruddhi Expressway Bus Fire : समृद्धी महामार्गावर थरार! १२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसने घेतला पेट, नेमकं काय घडलं?

ही बस एका खाजगी कंपनीची असल्याने या बसमधून कंपनीचे १५ ते २० कर्मचारी प्रवासी प्रवास करत होते. वाहन चालकाने प्रसंगावधता राखत प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणारी जीवित हानी टळली. बसला आग लागताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

Pune Bus Fire : पुण्यात अग्नितांडव! २० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसने घेतला पेट, नेमकं काय घडलं?
Crime News : चक्रीने घात केला! ऑनलाईन गेमिंगच्या आहारी जाऊन तरुणाची आत्महत्या, काय आहे प्रकार?

अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत भडका उडालेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान धावत्या गाडीला आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. सदर घटनेत वाहन चालकाच्या तत्परतेमुळे मोठी जीवित हानी टळली असून बस जळून खाक झाल्याने वीत्त हानी निर्माण झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com