Pune Porsche Car Accident: पुणे पोर्शे कार अपघातात मोठी अपडेट, अल्पवयीन आरोपीच्या आजोबाला अटक; ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचा आरोप

Pune Porsche Car Accident Latest Update: पुण्यातील हिट अँड रन केसमध्ये रोज नवनवे खुलासे होत आहेत. अशातच आता अल्पवयीन आरोपीच्या आजोबालाही अटक करण्यात आली आहे. अपघातावेळी कारमध्ये असलेल्या ड्रायव्हरला धमकावल्याचे तसेच डांबून ठेवल्याचे आरोप त्याच्यावर आहेत.
Pune Porsche Car Accident: पुणे पोर्शे कार अपघातात मोठी अपडेट; अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना अटक
Juvenile Justice Board Verdict On Kalyaninagar Accident CaseSaam Tv

पुणे, ता. २४ मे २०२४

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात एक सर्वात महत्वाची अपडेट समोर आली आहे. कार अपघातातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल याला अटक करण्यात आली आहे. अपघातानंतर आरोपीसोबत असलेल्या ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. पुणे गुन्हे शाखेने रात्री उशिरा ही मोठी कारवाई केली आहे.

पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात घडलेल्या हिट अँड रन प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीला बालसुधार गृहात पाठवण्यात आले असून त्याचे वडिल विशाल अग्रवाल याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असतानाच आणखी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.

अपघातावेळी अल्पवयीन मुलासोबत पोर्शे कारमध्ये असलेल्या ड्रायव्हरला डांबून ठेवल्याच्या तसेच धमकावणे आणि त्याचा मोबाईल काढून घेण्याच्या गंभीर आरोपाखाली आरोपीचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Porsche Car Accident: पुणे पोर्शे कार अपघातात मोठी अपडेट; अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना अटक
Maharashtra Water Crisis: विहिरींनी तळ गाठला, हातपंप आटले, मराठवाडा, पश्चिम विदर्भात भीषण पाणीटंचाई; हंडाभर पाण्यासाठी वणवण

अपघातानंतर पोर्शे कार चालकाला धमकावून जबाब देण्याबाबत दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप सुरेंद्र कुमार अग्रवाल याच्यावर करण्यात आला आहे. या आरोपांनंतर गुन्हे शाखेने रात्री उशिरा त्याला अटक केली आहे. दरम्यान, काल या प्रकरणात दोन पोलीस अधिकाऱ्यांचेही निलंबन करण्यात आले होते. त्यामुळे या अपघातात आणखी नवे खुलासे होण्याची शक्यता आहे.

Pune Porsche Car Accident: पुणे पोर्शे कार अपघातात मोठी अपडेट; अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना अटक
Akola Crime News: अकोल्यात सावकाराची दादागिरी; शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न, धक्कादायक VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com