पुणे पोर्शे कार अपघाताबाबत (Pune Porsche Car Accident) राज्यपालांनी प्रतिक्रिया दिली आहे. अल्पवयीन आरोपी मुलाला NCC चे प्रशिक्षण दिलं असतं तर दुर्घटना घडलीच नसती, असे वक्तव्य राज्यपाल रमेश बैस यांनी केले आहे. पुण्यातील या घटनेमुळे आता राजकारण चांगलेच तापले आहे. या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. अशामध्ये राज्यपालांचे हे वक्तव्य चर्चेत आले आहे. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये १९ मे च्या मध्यरात्री झालेल्या या अपघाताममध्ये २ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
पुण्याच्या या घटनेवर राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले की, 'पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला जर एनसीसी प्रशिक्षण मिळाले असते तर त्याच्याकडून ही दुर्घटना घडली नसती. एनसीसीमध्ये विद्यार्थ्यांवर देशभक्ती, शिस्त आणि समाजसेवेचे संस्कार घडतात. सर्वांकरीता एनसीसी प्रशिक्षण अनिवार्य झाले तर ती खरोखरच चांगली गोष्ट होईल.'
पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपी मुलगा हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. याप्रकरणात पुणे पोलिसांनी आरोपी मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना पोलिसांनी अटक केली असून ते सध्या पोलिस कोठडीमध्ये आहे. तर आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे, श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांना पोलिसांनी अटक केली. हे आरोपी देखील पोलिस कोठडीत आहेत. आज न्यायालयाने आरोपींच्या पोलिस कोठडीमध्ये ६ दिवसांची वाढ केली आहे.
दरम्यान, 19 मे रोजी मध्यरात्री आरोपी मुलाने आपल्या आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले होतो. कार चालवाताना आरोपी मुलगा मद्यधुंद अवस्थेत होता. या अपघातामध्ये अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला. हे दोघेही मूळचे मध्य प्रदेशचे होते आणि पुण्यामध्ये ते नोकरी करत होते. दोघेही इंजिनिअर होते. अनिस आणि अश्विनी आपल्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेले होते. त्याठिकाणावरून ते दुचाकीवरून आपल्या मित्रांसोबत येरवड्याच्या दिशेला जात असताना त्यांना पोर्शे कारने धडक दिली होती. यामध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.