Ajit Pawar vs Anjali Damania: मी नार्को टेस्ट करण्यास तयार; अजित पवारांनी दमानियांचं चॅलेंज स्वीकारलं

Pune Porsche Accident Ajit Pawar Accepted Anjali Damania Challenge: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात अंजली दमामनिया यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर आरोप केले होते.
Ajit Pawar vs Anjali Damania: मी नार्को टेस्ट करण्यास तयार; अजित पवारांनी दमानियांचं चॅलेंज स्वीकारलं
Anjali Damania vs Ajit PawarSaam TV
Published On

रायगड: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे चॅलेंज अजित पवार यांनी स्वीकारलंय. आपण नार्को टेस्ट करण्यास तयार आहोत, पण त्यात काही निघालं नाही. किंवा आपण त्यात दोषी आढळलो नाही, तर त्यांनी काही बोलायचं नाही. माध्यमांपुढे न येता घरीच बसून राहावं, असं प्रत्युत्तर अजित पवार यांनी दमानिया यांना दिलं

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. त्या आरोपावर उत्तर देताना अजित पवारांनी आरोप खोडून काढले होते. पत्रकार परिषदेत बोलतांना पत्रकाराने अचानकपणे विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार थोडेसे गांगरले होते. हाच धागा पकडत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना घेरलं.

इतर वेळी पत्रकारांना सडेतोड उत्तर देणारे अजित पवार पत्रकाराच्या प्रश्नावर गोंधळले का? असा सवाल त्यांनी अजित पवार यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी केली होती. दमानिया यांच्या नार्को टेस्टच्या मागणीवर अजित पवारांनी रायगड येथे पत्रकारांशी बोलताना उत्तर दिलं. नार्को टेस्टमध्ये आपण निर्दोष निघालो तर अंजली दमानिया यांनी संन्यास घेत गप्प घरी बसावं असं अजित पवार म्हणालेत.

राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,पालकमंत्री यांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं की,पुण्यातील कल्याणी अपघात प्रकरणातील दोषींवर कारवाई केली गेली पाहिजे.त्याचप्रकारे पोलीस तपास चालू आहे. जसा तपास पुढे जातोय,त्यात कोणाचे नावे येत आहेत,त्यापद्धतीने कारवाई केली जात आहे.ज्या मुलाने अपघात केलाय त्याला अटक करण्यात आलीय,त्यात त्याचे वडील आणि तसेच अल्पवयीन मुलाच्या आजोबालाही अटक करण्यात आल्याचं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.

त्यात कोणीही दोषी असेल, त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं अजित पवार म्हणालेत.अंजली दमानिया यांच्या आरोपांना उत्तर देताना अजित पवार म्हणाले की,त्यांनी केलेल्या आरोपप्रकरणी आणि त्यांनी केलेल्या नार्को टेस्टच्या मागणी प्रकरणी आपण तयार असल्याचं अजित पवार म्हणालेत.

सीडीआर तपासा

अंजली दमानिया यांचीच नार्को टेस्ट करा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी केली होती. दमानिया ह्या नेत्या नाहीत रिचार्जवर चालणारी बाई आहेत. सुपारी मिळाली की मागे लागतात. त्यांचा सीडीआर सरकारने तपासावा, अशी माझी सरकारकडे मागणी असल्याच चव्हाण म्हणाले. याशिवाय दमानिया कुणाच्या फायद्यासाठी आरोप करतात हे तपासलं पाहिजे, असेही चव्हाण म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com