Pune Porsche Accident Update: कितीही श्रीमंत बापाचा मुलगा असूद्या कारवाई होणारच, पुण्याच्या घटनेवर अजित पवारांनी ठणकावून सांगितलं

Ajit Pawar Stand on Pune Accident: पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर अजित पवार पुण्यात आले नाही आणि त्यांनी याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली नसल्यामुळे त्यांच्यावर टीक केली जात होती. आज अखेर पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त येत अजित पवारांनी याप्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली.
Pune Accident News: कितीही श्रीमंत बापाचा मुलगा असूद्या कारवाई होणारच, पुण्याच्या घटनेवर अजित पवारांनी ठणकावून सांगितलं
Ajit Pawar on Pune AccidentSaam TV

पुणे हिट अँड रन प्रकरणावर राज्याचे उपमुख्यंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. 'कितीही श्रीमंत बापाचा पोरगा असूद्या, कारवाई होणारच', असे अजित पवार यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना खडसावून सांगितले. अजित पवार यांनी आज पुण्यामध्ये टायटन घड्याळाच्या शोरुमच्या उद्घाटनाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत पुणे हिट अँड रन प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली.

Pune Accident News: कितीही श्रीमंत बापाचा मुलगा असूद्या कारवाई होणारच, पुण्याच्या घटनेवर अजित पवारांनी ठणकावून सांगितलं
Pune Porsche Accident Case : पोर्शे कार कोण चालवत होता? पुणे पोलीस आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती

पुण्याच्या घटनेप्रकरणी अजित पवार यांनी अद्याप प्रतिक्रिया दिली नव्हती तसंच ते पुण्यात आले नव्हते त्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात होती. यावर बोलताना अजित पवार यांनी 'टीका करणाऱ्या विरोधातांना उत्तर देताना सांगितले की, 'मी २१ आणि २२ तारखेला मंत्रालयात होतो. या घटनेवर मी लक्ष ठेवून होतो. माझं देवेंद्रजींशी बोलणं झालं. मी तातडीने पुण्यात जाऊन जातीने लक्ष घालणार असे त्यांनी मला सांगितले होते. कारण नसताना समाजात गैरसमज निर्माण करुन दिला जातो. यामध्ये पालकमंत्र्यांचे लक्ष नाही, कुणी लक्ष घातले नाही असा गैरसमज निर्माण करून दिला जातोय.'

अजित पवारांनी पुढे सांगितले की, 'मला मीडियापुढे यायला आवडत नाही हे अनेकांना माहिती आहे. मी माझे काम करत असतो. २१ तारखेला सकाळी ९ वाजता चेक करा की मी मंत्रालयात होतो की नाही. माझी काय कामं चालली होती ती म्हणजे, याप्रकरणात कुठल्याही राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप हता कामा नये. ही घटना अतिशय गंभीर आहे. या अशाप्रकारच्या गोष्टी पुन्हा घडता कामा नये.यामध्ये कायदा सुव्यवस्था उत्तम राखणं पोलिसांचे काम आहे. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. त्याबाबत मला सीपी वेळोवेळी माहिती देत होते. सीपी आणि मी सतत चर्चा केली. यामध्ये अल्पवयीन मुलाला बेल कसा मिळाला हे देखील तुम्हाला कळाले. बेल कसा द्यावा हा न्यायालयाचा प्रश्न आहे.'

Pune Accident News: कितीही श्रीमंत बापाचा मुलगा असूद्या कारवाई होणारच, पुण्याच्या घटनेवर अजित पवारांनी ठणकावून सांगितलं
Pune News: पोर्शे कार अपघातानंतर पुण्यात वातावरण तापलं; पब मालक आणि कर्मचारी आक्रमक, थेट रस्त्यावर उतरले

तसंच, 'याप्रकरणात पुढे सर्व गोष्टी कडक भूमिका घेऊन घ्यायला पाहिजे तशा घेतल्या गेल्या. यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही. यामध्ये पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न झाला आहे. या घटनेत मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि मी पालकमंत्री असल्याने पहिल्या दिवसापासून त्यात बारकाईने लक्ष देऊन आहे. घटनेची तीव्रता कमी झाल्यानंतर त्याला फाटे फुटतात. पुण्यात अनधिकृत पबची संस्कृती वाढली आहे. त्यावर कारवाई सुरू आहे.', असे अजित पवार यांनी सांगितले.

Pune Accident News: कितीही श्रीमंत बापाचा मुलगा असूद्या कारवाई होणारच, पुण्याच्या घटनेवर अजित पवारांनी ठणकावून सांगितलं
Pune Porsche Car Accident: मोठी बातमी! पुणे ड्रंक-ड्राईव्ह प्रकरणी पोलिसांचीही होणार चौकशी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com