Pune News:
Pune News:Saam Tv

Pune News: पुण्यातील रेस्टॉरंट अन् पबच्या मनमानी कारभाराला चाप; पोलिसांकडून नवीन नियमावली जाहीर

Pune Police Rules For Hotels Pubs: सोमवारी पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी शहरातील हॉटेल आणि पब यांच्यासाठी पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे.
Published on

Akshay Badwe

Rules for hotels Pubs In Pune City

पुणे शहरातील पोलीस आयुक्त पदाचा भार अमितेश कुमार यांनी स्विकारल्यापासून पुणे पोलीस (Pune Police) आता अॅक्शनमोडमध्ये आल्याचं दिसतंय. शहरातील गुन्हेगारी थांबवण्यासाठी विविध उपक्रम शहरात राबविले जात आहेत. काल झालेल्या पत्रकार परिषदेनंतर पुणे शहरातील हॉटेल आणि पब यांच्यासाठी पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे.  (Latest Marathi News)

पुण्यात ४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ पकडण्यात आले होते. त्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद (Amitesh Kumar Press Conference) घेतली होती. त्यानंतर त्यांनी पुण्यातील बार, पब्स जर रात्री दिड वाजल्यानंतर सुरू असतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई होणार असल्याचं सांगितलं आहे. शहरातील हॉटेल आणि पब यांच्यासाठी काय नियमावली आहे ते आपण जाणून घेऊ या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हॉटेल आणि पब यांच्यासाठी नियमावली

शहरातील हॉटेल आणि पब व्यवसायास परवानगी मध्यरात्री दीड वाजेपर्यंत परवानगी असणार (Rules for hotels Pubs) आहे. या नियमावलीचे पालन न करता उशिरापर्यंत हॉटेल, पब सुरू ठेवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.

पोलीसांनी केलेल्या सूचना

हॉटेलमध्ये बाहेरील कलाकार किंवा डीजे येणार असल्यास त्याची माहिती पोलिसांना देणे गरजेचे (Pune Police Rules For Hotels Pubs) आहे. स्वच्छतागृह वगळून हॉटेलमध्ये सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक आहे. हॉटेलमध्ये प्रवेश करणाऱ्या तसेच बाहेर पडण्याच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे असणे आवश्यक आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणातील डेटा साठविण्यासाठी दोन डीव्हीआर यंत्रे (hotels Pubs In Pune City) असावेत. हॉटेलमधील कर्मचारी, सुरक्षारक्षकांची चारित्र्य पडताळणी करावी. कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल असल्यास त्याला कामावर ठेवण्यासाठी पोलिस उपायुक्तांची परवानगी आवश्यक असेल. हॉटेलमध्ये धुम्रपानासाठी (स्मोकिंग झो) स्वतंत्र जागा असावी, अशा सूचना पोलिसांनी केल्या आहेत.

Pune News:
Pune Crime News: आधी अत्याचार मग जेल, जामिनावर बाहेर आल्यावर आरोपीचं पीडितेसोबत भयंकर कृत्य

शहरातील हुक्का पार्लर बंद

पुणे पोलीस आता रूफ टॉप हॉटेल्सवर करडी नजर ठेवून (Pune News) आहेत. शहरातील सर्व हुक्का पार्लर बंद करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. नुकतंच पुणे शहरात ड्रग्स तस्करांचं आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आलं आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी ३ ड्रग्स तस्करांना अटक केली आहे.

गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या सोशल अकाउंटवर कारवाई केल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. तसंच एकाच पोलीस ठाण्यात ५ वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्याची बदली करण्यात येणार (Pune Crime) असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे.

Pune News:
Pune Crime : येरवडा भागात ५ जणांच्या टोळक्याकडून वाहनांची तोडफोड; दहशत माजविण्याचा प्रयत्न

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com