MNS Vandalized School Office : पुण्यातील शाळेत मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड; खुर्च्या फेकल्या, केबिनच्या काचा फोडल्या

Pune News in Marathi : शाळेच्या प्रशासनाने कोरोना काळातील फी वसुलीसाठी १० वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे हॉलतिकीट नाकारले. यावरून वाघोलीतील मनसे कार्यकर्त्यांनी जेएसपीएम शाळा प्रशासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली.
pune news
pune newsSaam tv
Published On

सचिन जाधव, पुणे

Pune News in Marathi :

पुण्यात मनसे कार्यकर्त्यांनी वाघोली येथील खासगी शाळेची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी शाळेत प्रवेश करत केबिनच्या काचा फोडल्या आणि खुर्च्या फेकल्या. या खासगी शाळा प्रशासनाने कोरोना काळातील फी वसुलीसाठी १० वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे हॉल तिकीट नाकारले. यावरून वाघोलीतील मनसे कार्यकर्त्यांनी जेएसपीएम शाळा प्रशासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत शाळेची तोडफोड केली. (Latest Marathi News)

पुण्यातील वाघोली येथील जेएसपीएम शाळा प्रशासनाने १० वीच्या विद्यार्थ्यांकडून फी वसुलीसाठी हॉल तिकीट नाकारल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला होता. ही बाब मनसे कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या जेएसपीएम संस्थेच्या शाळेची तोडफोड केली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

pune news
Narayan Rane News : लोकसभा निवडणुकीत कुणाची जादू चालणार? नारायण राणेंनी देशाचा मूड सांगितला, म्हणाले...

शाळा प्रशासनाने फी वसुलीसाठी जेएसपीएम प्रोडिजी शाळेतील १० वीच्या विद्यार्थ्यांची हॉल तिकीटसाठी अडवणूक केल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला होता. यामुळे जेएसपीएम संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना ऐन परीक्षेच्या वेळेस मनस्ताप सहन करावा लागत आहे, असे म्हणत मनसेकडून तोडफोड करण्यात आली आहे.

कोरोना काळातील जुन्या फी वसुलीसाठी १० वीच्या परीक्षेचे हॉल तिकीट नाकारल्याचा आरोप करत मनसेकडून आंदोलन करत तोडफोड केली. मनसे कार्यकर्त्यांनी या शाळेच्या कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. या तोडफोडीत शाळेच्या कार्यालयाचे मोठे नुकसान झालं आहे.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या जेएसपीएम संस्थेची ही शाळा आहे. शाळेच्या कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com