Narayan Rane
Narayan RaneSaam Tv

Narayan Rane News : लोकसभा निवडणुकीत कुणाची जादू चालणार? नारायण राणेंनी देशाचा मूड सांगितला, म्हणाले...

Maharashtra Political news : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून मी उमेदवार असेल की आणखी कोण हे वरिष्ठ ठरवतील. मात्र उमेदवार कमळ निशाणीवरच असेल हे नक्की आहे, असं नारायण राणे यांनी म्हटलं.
Published on

Ratnagiri News :

राज्यसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे नारायण राणे आता लोकसभा निवडणूक लढू शकतात, असा अंदाज बांधला जात आहे. यावर आता नारायण राणे यांनी भाष्य केलं आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचाच दावा आहे आणि तो दावा पर्मनंट असणार, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मी उमेदवार असेल की आणखी कोण हे वरिष्ठ ठरवतील. मात्र उमेदवार कमळ निशाणीवरच असेल हे नक्की आहे. लोकसभेसाठी मी इच्छुक नाही, माझ्या संदर्भातील निर्णय निवडणुकीच्या अगोदर बोलणं उचित नाही.

पक्षाचे वरिष्ठ लोक आहेत ते ठरवतील. देशवासीयांचा मूड मोदीच असणार आहेत, असं नारायण राणे यांनी म्हटलं. आम्ही 48 पैकी 48 जागा जिंकणार, असा दावाही नारायण राणे यांनी केला आहे. (Political News)

Narayan Rane
Maharashtra Politics : महाराष्ट्रात येत्या १५-२० दिवसांत मोठी उलथापालथ; सत्ताधारी नेत्याकडून राजकीय भूकंपाचे संकेत

भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच सुरु आहे. शिंदे गटाने नेते, मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. ही जागा आमच्या हक्काची असल्याचा दावा शिंदे गट करत आहे. तर या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार असावा, अशी भाजप नेत्यांची इच्छा आहे. जो उमेदवार द्याल त्याला निवडून आणू, असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं होतं.

Narayan Rane
MNS BJP Mahayuti : मनसे-भाजप युती होणार का? आशिष शेलार स्पष्टच बोलले, राज ठाकरेंनी तर एकाच वाक्यात विषय संपवला

मात्र विनायक राऊत यांची या मतदारसंघात मोठी ताकद आहे. त्यामुळे महायुतीकडून राणे आणि सामंत यांचा विचार केला तर नारायण राणे यांचं पारडं जड आहे. त्यामुळे विनायक राऊत यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराचा पराभव करायचा असल्यास सध्याची राजकीय स्थिती पाहता नारायण राणेंना भाजपकडून उमेदवारी दिली जाऊ शकते. महायुतीतून याठिकाणी कोण बाजी मारणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com