Pune Police registered a case against Milind Ekbote and three persons in Shivaji Nagar police Station
Pune Police registered a case against Milind Ekbote and three persons in Shivaji Nagar police StationSaam TV

Milind Ekbote News: मोठी बातमी! मलिंद एकबोटे यांच्यासह तिघांवर पुण्यात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

Milind Ekbote Pune News: पुणे महापालिकेसमोर मोर्चा काढून बेकायदेशीर आंदोलन केल्याप्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्यासह ३ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Published on

Milind Ekbote Latest News

समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. पुणे महापालिकेसमोर मोर्चा काढून बेकायदेशीर आंदोलन केल्याप्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्यासह ३ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Pune Police registered a case against Milind Ekbote and three persons in Shivaji Nagar police Station
Devendra Fadnavis Video: देवेंद्र फडणवीसांचा नागपूर दौरा; त्या व्हिडीओमुळे सत्ताधारी-विरोधकांमुळे जुंपली

४ सप्टेंबर रोजी मिलिंद एकबोटे (Milind Ekbote), भाजप आमदार नितेश राणे आणि भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे यांच्यासह इतर काही जणांनी पुणे महानगरपालिकेवर मोर्चा काढला होता. पुण्यातील एका मंदिराच्या अतिक्रमणाविषयी हा मोर्चा काढण्यात आला होता.

या मोर्चामध्ये ‘आई भवानी शक्ती ते, पुणेश्वर मुक्ती दे’, ‘जय श्रीराम’ यासह इतर घोषणा देण्यात आल्या होत्या. दरम्यान, मोर्चामध्ये आमदार नितेश राणे आणि महेश लांडगे यांनी वादग्रस्त विधान करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची भाषणे दिली, असा आरोप अनेक जणांनी केला होता.

यावरुन मुस्लिम संघटना देखील आक्रमक झाल्या होत्या. नितेश राणे, मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करा, अन्यथा पुण्यात मोठं आंदोलन करू, असा इशाराही मुस्लिम संघटनांनी पुणे पोलिसांना (Pune Police) दिला होता. यासंदर्भात एक निवेदन देखील पोलिसांना देण्यात आलं होतं.

दरम्यान, मुस्लिम संघटनांनी दिलेल्या निवेदनानंतर पुणे पोलिसांनी आता पुणेश्वर पुनर्वसन समितीचे अध्यक्ष कुणाल कांबळे, समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे, किरण शिंदे , विशाल पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा सखोल तपास केला जाईल, असं देखील पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

Edited by - Satish Daud

Pune Police registered a case against Milind Ekbote and three persons in Shivaji Nagar police Station
Kirit Somaiya Threat: ५० लाख दे, नाहीतर 'तो' व्हिडीओ व्हायरल करेल; किरीट सोमय्या यांना अज्ञाताकडून धमकी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com