Crime : केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यकर्त्यावर हल्ला, पोलिसांनी गजा मारणेच्या टोळीतील तिघांची काढली धिंड|पाहा VIDEO

Pune Crime News : गेल्या आठवड्यात कोथरूडमध्ये देवेंद्र जोग यांना गजा मारणेच्या टोळीने बेदम मारहाण केली होती, त्याच सदस्यांची कोथरूडमधून पोलिसांनी धिंड काढली आहे.
Pune Crime News
Pune Crime News
Published On

Pune Police News : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपींची धिंड काढली आहे. पुणे पोलिसांकडून कुख्यात गुंड गजा मारण्याच्या टोळीतील सदस्यांची धिंड काढण्यात आली. गेल्या आठवड्यात कोथरूडमध्ये देवेंद्र जोग यांना गजा मारणेच्या टोळीने बेदम मारहाण केली होती, त्याच गुंडाची कोथरूडमधून पोलिसांनी धिंड काढली आहे.

पुणे पोलिसांनी आत्मपरिक्षण केले पाहिजे. तसेच, पुणे पोलीस डोळे बंद करून बसलेत का अशा भाषेत मोहोळ यांनी समाचार घेतला होता. यानंतर तात्काळ पोलिसांनी तीन आरोपींची कोथरूड परिसरातून धिंड काढली. ओम जिज्ञासू, किरण पडवळ आणि कुणाल तापकीर अशी या आरोपींची नावं आहेत.

Pune Crime News
Pune Crime : ८ जणांनी कोयता अन् तलवारीने सपासप वार केले, तरूणाचे हात-पाय तोडले, मध्यरा‍त्री कोथरूडमध्ये थरार

काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोथरूड परिसरात भेलकेनगर भागात एका मिरवणूकीदरम्यान कुख्यात गुंड गजा माने यांच्या टोळीतील काही जणांनी आयटी अभियंता देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केली होती. या हल्ल्यात देवेंद्र जखमी झाले होते. दरम्यान मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः पुण्यातील जोग यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.

Pune Crime News
Crime : घाटावर बोलत बसले, नवऱ्याने अचानक चाकू काढला अन् बायकोचा गळा चिरला... सांगली हादरले

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला शिव जयंतीच्या दिवशी मारहाण झाली होती. गजा मारणेच्या टोळीतील गुंडांनी ही मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेवर मोहोळ यांनी पुणे पोलीसांवर जाहीर नाराजी व्यक्त करत टीका केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांची मोठी कारवाई केली. ⁠गजा मारणेसह २७ गुडांना यात आरोपी करण्यात आले आहे. ७४ ठीकाणी घर झडती घेण्यात आली आहे.

Pune Crime News
Beed : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वारकर्‍यांची एन्ट्री, अन्न त्याग आंदोलनाबाबत घेतला मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com