Pune Crime: तरुणीवरील कोयता हल्ल्यानंतर पुणे पोलिस ऍक्शन मोडवर! महिला सुरक्षेबाबत घेतले महत्वाचे निर्णय

सहकारनगरमध्ये गाड्यांची तोडफोड आणि त्यानंतर सदाशिव पेठेत तरुणीवर झालेल्या हल्ल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam Tv
Published On: 

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune News: पुण्यातील सदाशिव पेठेत प्रेम संबंधांतून तरुणीवर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. भरचौकात हल्ला झाल्याने पुणे पोलिसांच्या कामगिरीवरही संतप्त प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळाल्या होत्या.

या घटनेनंतर पुणे पोलिस अलर्ट मोडवर आले असून शहरात दामिनी पथके तैनात करण्यात आली आहेत तसेच रात्रीच्या गस्तीत वाढ करण्यात आल्याचेही पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले आहे.

Pune Crime News
Pune Crime News: थेट कॉलेजमध्ये कोयता काढून माजवली दहशत; पोलिसांनी त्याच परिसरात धिंड काढून तरुणाचा उतरवला माज

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील सहकारनगर (Sahkarnagar) येथे झालेली गाड्यांची तोडफोड आणि त्यानंतर सदाशिव पेठेत (Sadashiv Peth) तरुणीवर झालेल्या हल्ल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. यानंतर आता पुणे पोलिस खडबडून जागे झाले असून पोलिसांचा रस्त्यावर जास्तीत जास्त वावर रहावा यासाठी सुचना देण्यात आल्या आहेत.

यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थिनी, महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकांची गस्त वाढविण्यात आली आहे. पुण्यातील कॉलेज, शाळा,क्लासेस, हॉस्टेल परिसरात ही पथके तैनात असतील. तसेच बीट मार्शलची संख्या वाढवली जाणार असल्याचे पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी सांगितले.

Pune Crime News
Nanded Food Poisoning: चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ; शाळेत मिळणाऱ्या खिचडीत आढळली शिजलेली पाल, २१ विद्यार्थ्यांना विषबाधा

प्रत्येक गुन्हेगारांवर नजर ठेवली जात असून अल्पवयीन गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी पोलिसांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढे शहरात रात्रीच्या वेळी नाकाबंदीची अंमलबजावणी देखील सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. दरम्यान, सदाशिव पेठेतील घटनेनंतरही पुणे आयुक्तांनी कारवाई करत सात पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com