Pune Police: पुणे पोलिसांचा नवा खाकी पॅटर्न! दहशत माजवणाऱ्यांना आणलं गुडघ्यावर; प्रतिज्ञा,भरस्त्यात मारायला लावल्या उड्या

Pune Police New Khaki Pattern : पुण्यातील बिबवेवाडी पोलिसांनी विविध गुन्ह्यातील आरोपींची अनोख्या पद्धतीने धिंड काढली. घरफोडी, वाहन तोडफोड, हत्यार घेऊन दहशत माजवणाऱ्या आरोपींच धिंड काढली.
Pune Police New Khaki Pattern
Bibwewadi Pune Police make accused persons jump and take a pledge in a public awareness action to curb crime.saam tv
Published On
Summary
  • बिबवेवाडी परिसरातील भररस्त्यात गुंडांची धिंड काढली.

  • नव्या खाकी पॅटर्नचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • विविध गुन्ह्यातील आरोपींची अनोख्या पद्धतीने धिंड

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

नाशिक पोलिसांच्या पाठोपाठ पुणे जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं म्हणायला लावलं. पुणे पोलिसांच्या नवा खाकी पॅटर्नचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. वाढत चाललेल्या गुन्हेगारीवर चाप लावण्यासाठी पुणे पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येतायत. पुण्यातील बिबवेवाडी पोलिसांनी विविध गुन्ह्यातील आरोपींची अनोख्या पद्धतीने धिंड काढली.

घरफोडी, वाहन तोडफोड, हत्यार घेऊन दहशत माजवणाऱ्या आरोपींना एकत्र करून भर रस्त्यात कंबरेवर हात ठेऊन उड्या मारायला लावल्या. तसंच भररस्त्यात त्यांना गुडघ्यावर चालयला लावलं. इथून पुढे गुन्हा करणार नाही, अशी प्रतिज्ञाही त्यांच्याकडून वधवून घेतली. बिबवेवाडी परिसरातील स्वामी विवेकानंद रोडवर सामान्य नागरिकांमध्ये नेत पोलिसांनी भररस्त्यात त्यांची धिंड काढली.

Pune Police New Khaki Pattern
Crime: नवरा कामाला गेला, समलिंगी पार्टनरसाठी आईकडून ५ महिन्यांच्या बाळाची हत्या; मृतदेहासोबत फोटो काढून पाठवले

एका दिवसापूर्वीच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला धमकावण्याचा प्रकार समोर आला होता. कार्यालयात शिरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना महर्षीनगरमध्ये घडली होती. ही घटना तेथील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. दरम्यान या घटनेप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Pune Police New Khaki Pattern
Buldhana Crime: सकाळी-सकाळी डोकं फिरलं, सपासप कुऱ्हाडीने वार करत आई-बाबाला संपवलं; नंतर स्वतःला लावला फास

महर्षीनगर परिसरात राष्ट्रवादीच्या नेत्याचं कार्यालय आहे. ५ नोव्हेंबर रोजी ते कार्यालयात असताना रात्री १० वाजण्याच्या सुमारास एक तरुण त्यांच्या कार्यालयात शिरला. त्याच्या हातामध्ये लाकडी बांबू होता. त्याने अचानक त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यांना धमकावल्यानंतर तो तेथून पळून गेला.

पुण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या बाजीराव रोडवर एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना तीन दिवसापूर्वी घडली होती. भररस्त्यात सपासप वार करत तरुणाचा खून करण्यात आला. मयंक खराडे असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com