पुण्यात ड्रग्जचा मोठा कारखाना सुरू करण्याचा कट उधळला; सव्वा कोटींच्या मुद्देमालासह ८ जणांना अटक

Pune drug racket busted : पुण्यात एमडी ड्रग्जचा कारखाना सुरू करण्याचा कट वाघोली पोलिसांनी उधळला. मुख्य सूत्रधार सुमीत घुलेसह ८ जणांना अटक कऱण्यात आली आहे.
Pune drug racket bust
Wagholi police officials display seized MD drugs, luxury vehicles and arrested accused in Pune narcotics bust.Saam TV
Published On

Pune drug racket bust : पुण्यात ‘एमडी’ ड्रग्जचा कारखाना उघडण्याचा कट उधळण्यात आला आहे. सव्वा कोटींच्या मुद्देमालासह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. थेट ड्रग्स तयार करण्याचा कारखाना सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या एका आंतरराज्य टोळीचा वाघोली पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह आठ आरोपींना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून २२५ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि आलिशान मोटारी असा एक कोटी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी सुमीत अशोक घुले (वय ४१), अनिस शम्मू सय्यद (वय २८), हरी उत्तम उफाडे (वय ३५), प्रतीक उर्फ सोन्याबापू होले (वय ३२), ऋषिकेश उर्फ राम यनभर (वय २९), रामनिवास रानूराम बिश्नोई (वय २५), आकाश अशोक ढवळे (वय २६) आणि बिपिनकुमार श्रीरामसागर पंडित (वय ५४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.

Pune drug racket bust
Shocking : सरकारच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी राजेंद्र गडगे भोंदूबाबासह शिंदेला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील केसनंद येथून अनिस सय्यद आणि हरी उफाडे यांना पाच ग्रॅम एमडीसह पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्याचा तपास करत असताना मुख्य सूत्रधार सुमीत घुले हा असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास बदलला. पोलिसांनी अखेर त्याला अहमदाबाद येथून अटक केली.

Pune drug racket bust
PM नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याचा कट; शत्रू राष्ट्रांचं कनेक्शन उघड

तपासादरम्यान आरोपी घुले हा आकाश ढवळेच्या मदतीने पुणे शहरात आणि ग्रामीण भागात ड्रग्जची विक्री करत होता. विशेष म्हणजे, कुरकुंभ ड्रग्ज प्रकरणातील आरोपी बिपिनकुमार पंडित हा सध्या जामिनावर बाहेर होता. त्याच्या मदतीने ग्रामीण भागात एमडी बनविण्याचा कारखाना सुरू करण्याची या टोळीची तयारी होती. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी हे रॅकेट उद्ध्वस्त केले. आरोपींकडून ४५ लाख ६० हजार रुपये किमतीचे २२५ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com