Pune Crime News: धक्कादायक! 50 हजारांसाठी पुण्यातील अल्पवयीन मुलीला मध्य प्रदेशमध्ये विकले

५० हजार रुपयांसाठी पुण्यातील १४ वर्षीय मुलीचा मध्य प्रदेशमध्ये सौदा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Bharati Vidyapeeth Police Pune
Bharati Vidyapeeth Police PuneSAAM TV

सचिन जाधव

Pune News : पुण्यातून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. ५० हजार रुपयांसाठी पुण्यातील १४ वर्षीय मुलीचा मध्य प्रदेशमध्ये सौदा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या ५० हजार रुपयांसाठी अल्पवयीन मुलीला विकून तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील अल्पयवीन मुलीला ५० हजार रुपयांसाठी १४ वर्षीय मुलीचा मध्य प्रदेशमध्ये सौदा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अल्पवयीन मुलीला विकून तिचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले. अल्पवयीन मुलीला पुण्यातून (Pune) पळवून नेऊन मध्य प्रदेशमध्ये विकणाऱ्या २ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Bharati Vidyapeeth Police Pune
Pune Crime News: पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने मागितली तीन कोटींची खंडणी; दोघांविरुद्ध गुन्हा

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीची पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशमध्ये जाऊन सुटका केली आहे. या प्रकरणी शांती उर्फ सांतो (४०) आणि धर्मेंद्र (२२) असे अटक केलेल्या या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन मुलीची मोठी बहीण पुण्यातील एका वर्कशॉप मध्ये काम करत होती. त्यावेळी या तरुणीची ओळख शांतीशी झाली. शांतीने या तरुणीला तिच्या आवडीचा असलेल्या मुलाशी लग्न लावून देते असे खोटे आश्वासन देऊन तिला मध्य प्रदेश या ठिकाणी नेले.

Bharati Vidyapeeth Police Pune
Nashik Crime News : बापरे बाप! केकचे पैसे मागितल्याने दुकानदारावर उगारला कोयता; काळजात धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) नेऊन शांतीने या अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने अवघ्या ५० हजार रुपयांसाठी धर्मेंद्र यादव या अरोपीशी लग्न लावून दिले. दरम्यान, धर्मेंदने शांतीला करण्यासाठी एक मुलगी शोध आणि पैसे घे असे सांगितल्याने हा सगळा प्रकार शांतीने केला. पोलिसांनी या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी मध्य प्रदेश गाठले आणि आरोपींना अटक केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com