Nashik Crime News : बापरे बाप! केकचे पैसे मागितल्याने दुकानदारावर उगारला कोयता; काळजात धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

koyata gang : या घटनेनंतर पोलिसांनी त्यांच्या कारवाईला सुरूवात केली असून अतापर्यंत ६ संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
Nashik Crime News
Nashik Crime News Saam TV

Crime News : पुणे शहरात धुमाकूळ घातलेली कोयता गँग आता नाशिकमध्ये पोहचली आहे. काल (रविवारी) रात्री नाशिक शहरात कोयता गँगचा थरार पहायला मिळाला. सातपूर पिरसरात एका केक दुकानदारावर कोयते घेऊन काही मुलं धावून आली होती. या घटनेबाबत दुकानदाराने पोलिस ठाण्यात धाव घेतली असून तक्रार दाखल केली आहे. पोलीस नाशकातील या कोयता गँगचा शोध घेततायत. ( koyata gang)

समोर आलेल्या माहितीनुसार, सदर धक्कादायक घटना दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाली आहे. सातपूर परिसरात असेल्या केकच्या दुकानात काल रात्री २ व्यक्ती केक घेण्यासाठी आले होते. त्यवेळी त्यातील एक तरुण केक घेऊन पैसे न देताच दुकानातून बाहेर निघाला. दुकानदाराच्या हे लक्षात येताच त्याने दुसऱ्या व्यक्तीला तो तरुण तुमच्यासोबत आहे का असे विचारले. त्यावर त्या व्यक्तीने नाही असे उत्तर दिले.

Nashik Crime News
Crime News : हृदयद्रावक! भावानेच अवघ्या १० वर्षीय लहान भावाचा दिला बळी; कारण ऐकून तुमचंही काळीज हादरेल

म्हणजे हा तरुण आपले पैसे न देताच बाहेर निघाला आहे, असं दुकानदाराला वाटतं. त्यामुळे दुकानदार त्या तरुणाला जोरजोरात आवाज देत थांबवतो आणि केकचे पैसे मागतो. आपण चोर नाही आणि पैसे देणारच आहे असं म्हणत त्या तरुणाने यावेळी संताप व्यक्त केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे की, तरुणासोबत आलेली इतर मुलं देखील केक दुकानदाराशी भांडत आहेत.

या दोघांची बाचाबाची वाढल्यावर त्या तरुणाला राग अनावर होतो. त्यामुळे इतर मुलांसह तरुण दुकानादार व्यक्तीला मारण्यासाठी धावून जातता. पुढे दुकानातून बाहेर येत रस्त्यावर देखील दोघांमध्ये वाद सुरू होतो. त्यावर तरुण मुलगा दुकानदारावर थेट कोयता उगारतो. तो कोयता घेऊन दुकानदाराच्या अंगावर धावून जातो. या घटनेनंतर पोलिसांनी त्यांच्या कारवाईला सुरूवात केली असून अतापर्यंत ६ संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

Nashik Crime News
Crime News : गर्लफ्रेंडचे लग्न दुसऱ्यासोबत ठरताच बॉयफ्रेंड संतापला; नवरदेवास पाठवला दोघांचा नको त्या अवस्थेमधला व्हिडिओ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com