Pune Latest News : पुणेकरांच्या जीवाशी खेळ!, एका हातात मोबाईल, दुसऱ्या हातात स्टेअरिंग, PMPML बस चालकाचा VIDEO व्हायरल

Pune PMPML Bus Driver Viral Video : व्हिडीओतील दृष्टांनुसार, पुणे-नगर महामार्गावर पीएमपीएमएल बसमधून प्रवाशांची वाहतूक करताना बस चालक हात सोडून, मोबाईलवर बोलत असल्याच दिसत आहे.
Pune Latest News
Pune Latest NewsSaam TV
Published On

सचिन जाधव

Pune News :

पीएमपी बस चालकाचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये चालक मोबाईलमध्ये व्हिडीओ पाहत बस चालवताना दिसत आहे. बसमध्ये प्रवासी प्रवास करत असतानाचा हा प्रकार आहे. त्यामुळे एकप्रकारे हा पुणेकऱ्यांच्या जीवाशी खेळ आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिक्रापूर येथील एका नागरिकाने पुणे-नगर महामार्गावरून पीएमपीएल बसमधून प्रवास करत असताना बस चालकाचं हे कृत्य कॅमेऱ्यात कैद केलं. चालक वारंवार बसच्या बाहेर तोंड काढून थुंकत होता. सारखं हात सोडून मोबाईलवर बोलत होता. दरम्यान नागरिकाने या घटनेचे चित्रीकरण केले. (Pune News)

Pune Latest News
Shrikant Shinde: आदित्य ठाकरे कल्याणमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा, श्रीकांत शिंदे यांनी थेट आव्हानच दिलं

या प्रकारामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. चालकाची ही बेफिकीरी अतिशय गंभीर असल्याने याच्यावर कारवाई करावी तसेच अशा प्रकारामुळे कोणती दुर्घटना घडणार नाही यासाठी पीएमपीने चालकांना सूचना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com