Pune Crime : 'तुझा बाबा सिद्धीकी करू' पुण्यातील प्रसिद्ध गोल्डन मॅनला लॉरेन्स बिश्नोईची धमकी
Pune Pimpari Chinchwad Sunny Waghchaure Saam Tv

Pune Crime : 'तुझा बाबा सिद्धीकी करू' पुण्यातील प्रसिद्ध गोल्डन मॅनला लॉरेन्स बिश्नोईची धमकी

Pune Pimpari Chinchwad Sunny Waghchaure : पिंपरी-चिंचवडमधील ‘गोल्डन मॅन’ यांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून ५ कोटींच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Published on
Summary
  • सनी वाघचौरे यांना ५ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकी

  • लॉरेन्स बिष्णोई गँगचे नाव घेऊन शुभम लोणकरची धमकी

  • कॅनडातून आलेल्या व्हॉट्सॲप कॉलमुळे खळबळ

  • पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून तपास सुरू

Pune Golden Man Sunny Waghchaure Received a Threatening Call पुण्यातील पिंपरी चिंचवड मधील 'गोल्डन मॅन' म्हणून ओळख असलेल्या सनी वाघचौरेला लॉरेन्स बिष्णोई गँग सदस्यांकडून ५ कोटीच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याची बातमी समोर आली आहे. रक्कम न दिल्यास 'तुझा बाबा सिद्दिकी करू' अशी थेट धमकी गँगमधील शुभम लोणकर याने दिल्याच सनी वाघचौरे यांनी दिलेल्या पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणानंतर सनी वाघचौरे यांनी थेट पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात धाव घेत, लेखी तक्रार दाखल केली. शिवाय माझ्या जीवाला धोका असून, लवकरात लवकर कारवाई करून पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

रविवारी म्हणजेच २५ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजून २२ मिनिटांनी कॅनडा देशातील एका नंबरवरून सनी वाघचौरे यांना व्हॉट्सॲप कॉल आला, मात्र त्यांनी तो उचलला नाही. त्यानंतर त्यांना “शुभम लोणकर कॉल मी” असा मेसेज आला. यानंतर पुन्हा आलेला व्हॉट्सॲप कॉल उचलल्यानंतर, समोरून “मी बिश्नोई गँगमधून शुभम लोणकर बोलतोय. गुगलवर सर्च करून बघ, बिश्नोई गँग कोण आहे ते. बाकी मेसेजवर बोलेन,” असे सांगून फोन कट करण्यात आला.

Pune Crime : 'तुझा बाबा सिद्धीकी करू' पुण्यातील प्रसिद्ध गोल्डन मॅनला लॉरेन्स बिश्नोईची धमकी
KDMC Mayor : कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेचा महापौर कोण होणार? शिंदेंच्या या २ शिलेदारांची चर्चा

त्यानंतर वेगवेगळ्या नंबरवरून सतत व्हॉट्सॲप कॉल येऊ लागले. मात्र सुरुवातीला कोणीतरी मस्करी करत असल्याचे समजून सनी वाघचौरे यांनी ते गांभीर्याने घेतले नाही. २६ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजून २१ मिनिटांनी पुन्हा आंतरराष्ट्रीय नंबरवरून व्हॉट्सॲपवर थेट धमकीचा मेसेज आल्याने ते घाबरून गेले. खंडणीसाठी पाच दिवसांची मुदत देण्यात आली असून, रक्कम न दिल्यास बाबा सिद्दिकीसारखी हत्या करण्याचा इशारा देण्यात आला असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तक्रारीच्या आधारे तपास सुरू केला आहे.

Pune Crime : 'तुझा बाबा सिद्धीकी करू' पुण्यातील प्रसिद्ध गोल्डन मॅनला लॉरेन्स बिश्नोईची धमकी
Mumbai Metro Line 8 : मुंबई - नवी मुंबई एअरपोर्ट मेट्रो-८ द्वारे जोडणार, गोल्डन लाईनवर कोणती २० स्थानके असणार? नावं आली समोर

कोण आहेत 'गोल्डन मॅन'?

सनी नाना वाघचौरे अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सोन्याचे दागिने घालून उपस्थित राहत असल्याने ते ‘गोल्डन मॅन’ म्हणून ओळखले जातात. ६ जानेवारी रोजी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वर्गीय अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. सध्या सोशल मीडियावर त्यांचे २५ मिलियन फॉलोअर्स आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com