Weather Alert : आज रेड अलर्ट, पुणेकरांनो सतर्क राहा, काळजी घ्या; भिडे पूल पाण्याखाली, खडकवासलातून पुन्हा विसर्ग!

भारतीय हवामान खात्याकडून पुणे आणि सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.
Pune Khadakwasla Dam Water
Pune Dam Water Storage Latest Update: Saam TV
Published On

Pune on Red Alert for Extreme Heavy Rainfal : राज्यभरात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून (IMD) पुणे आणि साताऱ्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात (Pune Rain Update) आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रशासनाकडून पुणेकरांना सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा, असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणं काटोकाट भरली आहेत. खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) आता विसर्ग आणखी वाढणार आहे. त्याशिवाय शहरातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. शांतीनगर आणि येरवाडा परिसरातील जवळपास ४०० ते ५०० जणांचे स्थलांतर करण्यात आलेले आहे.

कोयना, खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरण क्षेत्रातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्याकडून आढावा घेण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करण्याचे प्रशासनाला निर्देश देण्यात आलेत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर परिसर क्षेत्रातील तसेच कृष्णाकाठच्या गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहे. नागरिकांनाही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आलेय.

Pune Khadakwasla Dam Water
Pune Rain Alert : पुण्याला पाणीपुरवठा करणारी सर्व जलाशये काठोकाठ भरली; शहरातील ४०० ते ५०० नागरिकांचे स्थलांतर

पुण्याला रेड अलर्ट Pune on Red Alert -

हवामान विभागाकडून आज राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. कोकणातील रायगड, रत्नागिरी तसेच ठाणे पालघर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिकमध्ये धो धो पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

काळजी घ्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुणेकरांना आवाहन -

भारतीय हवामान खात्याने पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. कोयना धरणक्षेत्रात तसेच पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात येत आहे. खडकवासला धरणातून सध्या 27 हजार 16 क्युसेक्स, मुळशीतून 27 हजार 609 क्युसेक्स, पवनातून 5 हजार क्युसेक्स, चासकमान धरणातून 8 हजार 50 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरु आहे. धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरु राहिल्यास विसर्गाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. त्यासाठी स्थानिक प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षित निवाऱ्याची सोय करावी. त्यांना संपूर्ण मदत, सहकार्य करावे, असे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. कोयना धरणातूनही सध्या 5 हजार क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरु असल्याने कृष्णाकाठच्या गावांना तसेच तेथील पुररेषेलगतच्या नागरिकांनीही आवश्यक काळजी घ्यावी, प्रशासनानेही त्यांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

Pune Khadakwasla Dam Water
Weather Alert : महाराष्ट्रात पुढील 48 तास तुफान पावसाचे, आज मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

निरा-देवघर अन् भाटकरही काठोकाठ भरलं

निरा देवघर धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे नदी पात्रामध्ये सुरू असणाऱ्या विसर्गात वाढ करून एकूण ७ हजार ६९ क्युसेक विसर्ग नदीपात्रामध्ये करण्यात येणार आहे. नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे सांगण्यात आलेय.

भाटघर धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत असून धरण १०० टक्के भरले आहे. नदीपात्रात सुरू असलेल्या विसर्गात वाढ करुन सकाळी ६.३० वा. विद्युत निर्मिती केंद्राद्वारे १ हजार ६६१ आणि सांडव्याद्वारे १७ हजार ५०० क्युसेक असा एकूण १९ हजार १३१ क्युसेक विसर्ग नदी पात्रामध्ये सुरू करण्यात आला आहे. नदीच्या काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून कऱण्यात आलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com