पुण्यात भीषण अपघात! PMPML बसने दुचाकीला वळणावर उडवले, तरूण-तरूणीचा रस्त्यावरच मृत्यू

Pune Accident Between PMPML Bus and Bike: कात्रज घाट वळणावर PMPML बस आणि दुचाकीचा भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी.
Pune Accident Between PMPML Bus and Bike
Pune Accident Between PMPML Bus and BikeSaam
Published On
Summary
  • पुण्यात भीषण अपघात.

  • PMPML बसची दुचाकीला धडक.

  • दोघांचा जागीच मृत्यू.

सचिन जाधव, साम टिव्ही

पुण्यातील कात्रज भिलारेवाडी परिसरातून भीषण अपघाताची घटना उघडकीस आली आहे. कात्रज घाट वळणावर पीएमपीएमएल बस आणि दुचाकीचा भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद आंबेगाव पोलिसांनी केली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ही धक्कादायक घटना कात्रज वळणावर मंगळवारी सकाळी पावणे नऊ वाजताच्या दरम्यान घडली. कात्रज आगाराची, कात्रज सारोळा कात्रज ही बस ससेवाडीवरून पुण्याच्या दिशेनं येत होती. यावेळी दुचाकी देखील त्याच बाजूनं जात होती. पीएमटी बसने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. पाठीमागून जोरात धडक दिल्याने अपघात झाला.

Pune Accident Between PMPML Bus and Bike
शूटिंगदरम्यान ह्रदयविकाराचा झटका, प्रसिद्ध अभिनेत्याचे ५९ वर्षी निधन, सिनेसृष्टी शोक सागरात बुडाली

दुचाकी थेट रस्त्यावर घसरली. या अपघातात आकाश रामदास गोगावले (वय वर्ष २९) आणि अनुष्का प्रकाश वाडकर (वय वर्ष २७) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. नेहा कैलास गोगावले (वय वर्ष २०) ही तरूणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर सध्या भारती हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे.

Pune Accident Between PMPML Bus and Bike
निवडणुकीआधी महाविकास आघाडी फुटणार? काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा निर्णय? बैठकीत नेमकं काय घडलं?

या घटनेनंतर स्थानिकांनी बचावकार्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आंबेगाव पोलिसांनाही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले. याप्रकरणी पोलिसांनी पीएमटीचे चालक सुधीर दिलीप कोंडे (वय वर्ष ४२) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.

याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, अपघात घडल्यानंतर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. भारती विद्यापीठ वाहतूक विभाग आणि आंबेगाव पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेनंतर कात्रज परिसरात खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com