Baramati Lok Sabha: चर्चा तर होणारच! निकालाआधीच बारामतीत झळकले सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर

Supriya Sules Victory Banner In Indapur: लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर लागलेले आहेत. इंदापूर शहरात बॅनरची चर्चा रंगली आहे.
सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर
Supriya Sules Victory Banner In IndapurSaam Tv
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही पुणे

लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच बारामती लोकसभा मतदारसंघात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. कारण इंदापूर शहरात निकालापूर्वीच सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर लागले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात या बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे. निकालाच्या तीन दिवस आधीच सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर इंदापूरमध्ये लागले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख जवळ येत आहे. आता बारामतीमध्ये (Baramati Lok Sabha) आपण सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगताना पाहिला आहे. त्यामुळे बारामतीमधून कोणता उमेदवार निवडून येणार, यावरून कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच चुरस दिसत येत (Supriya Sules Victory Banner In Indapur) आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघाचा निकाल अधिकृतपणे जाहीर होण्याआधीच मविआच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यावर गुलाल उधळल्याचं दिसतंय. कारण सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर लागले (Lok Sabha Election Result 2024) आहेत.

बॅनरची शहरासह तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. इंदापूर शहरातील ओबीसी सेलचे शहराध्यक्ष मयूर शिंदे यांनी हे बॅनर लावल्याची माहिती मिळत आहे. सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.

सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर
Supriya Sule News : दत्ता भरणेंच्या अडचणीत भर; सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार, काय आहे प्रकरण?

बारामती मतदारसंघात हायव्होल्टेज ड्रामा या निवडणुकीत पाहावयास मिळाला आहे. निवडणुकीत इंदापूर तालुक्यातही मोठी चुरस दिसुन आली आहे. मात्र, आता इंदापूरमध्ये लोकसभेच्या निकालाच्या तीन दिवस अगोदरच महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule News)यांच्या विजयाचे बॅनर लागल्याने एकच चर्चा रंगली आहे. सध्या हा बॅनर चर्चेचा विषय बनलेला आहे. निवडणूक निकालाची तारीख जवळ येत आहे, तसे सर्वच पक्षांचे कार्यकर्ते आपल्या नेत्यांच्या विजयाचे बॅनर लावताना दिसत आहेत. बारामतीमधून नक्की कोण बाजी मारणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

रायगडमध्ये देखील लोकसभा निकालापूर्वीच सुनील तटकरे यांच्याही विजयाचे बॅनर लागले आहेत. आलिबाग बसस्टॅंड परिसरात हे बॅनर दिसून आले आहेत. सुनील तटकरे हे महायुतीचे उमेदवार आहेत. रायगडमधून नक्की कोण बाजी मारणार, याचीही उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर
Supriya Sule News: मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या काटेवाडीतील घरी गेल्यानं चर्चांना उधाण! निमित्त कौंटुबिक भेटीचं..

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com