अक्षय बडवे, पुणे|ता. २९ जानेवारी २०२४
पुण्यामध्ये आज एका आगळ्यावेगळ्या मुलाखतीचा कार्यक्रम पार पडत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे या खासदार संजय राऊत यांची प्रकट मुलाखत घेत आहेत. पुण्यातील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून होत असलेल्या या कार्यक्रमात अंधारेंच्या बेधडक सवालांना राऊतांनीही त्यांच्या खास शैलीत उत्तरे दिली. यावेळी राज ठाकरे यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर राऊतांचे उत्तर अगदीच खास होते. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर.
भीती वाटत नाही का? अंधारेंचा सवाल..
या प्रकट मुलाखतीत सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) संजय राऊतांना विचारलेल्या पहिल्याच सवालाने सभागृहात हशा पिकला. "राऊत साहेब एवढं बोलता भीती वाटत नाही का?" असा सवाल अंधारेंनी विचारला. त्यावर राऊतांनीही (Sanjay Raut) बेधडक उत्तर दिले.
राऊतांचे बेधडक उत्तर...
'मी अशा व्यासपीठावर पक्षीय कधी नसतो. गेल्या 40 वर्षात माझ्यावर अनेक शिक्के लागले कधी पवारांचा माणूस तर कधी काँग्रेसचा माणूस पण मी शिवसैनिक आहे. मी बाळासाहेबांचाच आहे 40 वर्षांपासून मी शिवसेनेतच आहेत. ज्या माणसाने 40 वर्षे बाळासाहेब यांच्यासोबत काढली त्याला भीती कशी वाटेल?' असे ते म्हणाले.
"राजकारणात ज्या ज्या भयंकर गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या मी केल्या आहेत. आमच्यासाठी शिवसेना हा राजकीय पक्ष नाही किंवा सत्ता घेण्यासाठीच साधन नाही. राजकारणात भीती बाजूला खुंटीला टांगून ठेवावी लागते. आम्ही डोळ्याने रक्तपात आणि हिंसाचार पहिला आहे," असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
"तुम्ही राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे मित्र आहात का? असा सवाल सुषमा अंधारेंनी विचारला. यावर बोलताना राऊत यांनी राज ठाकरे अजूनही सुद्धा माझे स्नेही आहेत. शरद पवार सुद्धा स्नेही आहेत. राहुल गांधी यांच्याशी स्नेह कायम राहतील आणि ओवेसी पण माझे मित्र आहेत. माझे सर्वांशी आणि विशेषतः टीका करणाऱ्यांशी माझे चांगले संबंध आहेत, असे राऊत म्हणाले. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.