Pune News : पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ४ गाड्या दाखल

पुणे शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील लुल्लानगर परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलला भीषण आग लागली आहे.
Pune Hotel Massive Fire
Pune Hotel Massive Fire Saam TV

Pune Hotel Massive Fire : पुणे शहरातून (Pune) एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील लुल्लानगर परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलला भीषण आग लागली आहे. एका इमारतीच्या ७ व्या मजल्यावर हे हॉटेल असल्याने आगीचे लोण पसरत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. (Pune Hotel Fire Latest News)

Pune Hotel Massive Fire
LPG Cylinder Price : महागाईतून मोठा दिलासा, गॅस सिलेंडर झाला तब्बल 'इतक्या' रुपयांनी स्वस्त

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नेमकी ही आग (Fire) कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुण्यातील कोंढाव्यातल्या लुल्लानगर चौक परिसरात ही प्रसिद्ध हॉटेल आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास हॉटेलमधील वरच्या मजल्यांवरून धूर निघत असल्याचं निवासी नागरिकांना दिसलं.

क्षणार्धातच या आगीने रौद्ररुपधारक केलं. आग इतकी भीषण आहे की आगीचे लोळ दुरपर्यंत दिसून येत आहे. दरम्यान, आग लागल्यानंतर सिलेंडरचे स्फोटही झाले असल्याची माहिती आहे. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.

Pune Hotel Massive Fire
Bachchu Kadu : अमरावतीत आज प्रहारचा मेळावा, बच्चू कडूंच्या भूमिकेकडं लक्ष; ठिकठिकाणी झळकले पोस्टर्स

आग लागलेल्या इमारतीत अनेक दुकाने, ऑफिस, आणि सोन्याची दुकाने आहेत. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. आग भीषण असल्यामुळे हॉटेलच्या आतमध्ये प्रवेश करताना अडथळे निर्माण होत आहेत.

दरम्यान, आग लागल्यानंतर सिलेंडरचे स्फोटही झाले असल्याची माहिती आहे. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसून हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com