सागर आव्हाड साम टिव्ही, पुणे
पुण्यामधून (Pune News) एक विचित्र घटना समोर आली आहे. एक व्यक्ती आंबे काढायला झाडावर चढला आणि तिथेच बेशुद्ध होऊन अडकल्याची (Man Stuck On Tree) घटना घडली आहे. सुमारे ३० मिनिटांच्या रेस्क्यु ऑपरेशनंतर या व्यक्तीची सुटका करण्यात यश मिळालं आहे. कोथरूडमध्ये (Kothrud) ही घटना घडली आहे. आपण या घटनेबद्दल सविस्तर पाहू या.
कोथरूड येथील कृष्णा हॉस्पिटलनजीक गल्ली क्रमांक तीन येथे एका इमारतीच्या मागच्या बाजूस झाडावर एक व्यक्ती आंबे चढली होती. बेशुद्ध होऊन ती झाडावरच अडकल्याची घटना मंगळवारी दुपाारी चार वाजता घडली (Man Stuck On Tree Rescued) आहे. ही माहिती मिळताच कोथरूड अग्निशमन केंद्रातील गाडी आणि मुख्यालयातून रेस्क्यू व्हॅन रवाना करण्यात आली होती. सुमारे ३० मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांनी या व्यक्तीची सुटका केली आहे.
अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका उंच आंब्याच्या झाडावर तीन फांद्याच्या मधोमध एक व्यक्ती सुमारे पस्तीस फूट उंचावर अडकल्याचं निदर्शनास आलं (Rescue Operation) होतं. घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच अग्निशमन दलाचे जवान त्यांच्याकडील शिडी लावून झाडावर गेले आणि त्या व्यक्तीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या व्यक्तीने त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही.
मात्र, ती व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत असल्याचं त्यांना (Kothrud News) जाणवलं. त्याच वेळी त्यांनी तातडीने दोरीचा वापर करून रेस्क्यू बेल्टच्या साहाय्याने, तसेच व्यक्तीचे वजन अंदाजे शंभर किलोच्या आसपास असल्याने विषेश गाठीचा उपयोग करून हळूहळू आणि कोणतीही इजा होणार नाही, याची काळजी घेत सुमारे ३० मिनिटांत झाडावरून खाली उतरवले आणि तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात रवाना केलं (Man Stuck On Tree Rescue Operation) आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.