Pune's Katraj Zoo Leopard : अखेर कात्रज प्राणी संग्रहालयातून पळालेला बिबट्या जेरबंद, ४८ तासांच्या अथक प्रयत्नांना यश

Pune's Katraj Zoo Leopard update : पुण्यातील कात्रज प्राणी संग्रहालयातील पळालेल्या बिबट्याबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. ४८ तासानंतर कात्रज प्राणी संग्रहालयातील पळालेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात प्रशासनाला यश आलं आहे.
Pune's Katraj Zoo Leopard
Pune's Katraj Zoo Leopard Saam tv
Published On

Pune Latest News :

पुण्यातील कात्रज प्राणी संग्रहालयातील पळालेल्या बिबट्याबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. ४८ तासानंतर कात्रज प्राणी संग्रहालयातील पळालेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात प्रशासनाला यश आलं आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या. या पळालेल्या बिबट्याला मंगळवारी रात्री ९:१५ वाजता या बिबट्याला जेरबंद करण्यास यश आलं आहे. बिबट्याला जेरबंद केल्याने परिसातील लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. (Latest Marathi News)

पुण्यातील कात्रजमधी राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील बिबट्या पसार झाला होता. गेल्या ४८ तासांपासून पळालेल्या बिबट्याचा शोध सुरु होता. पिंजऱ्यातून पळालेल्या बिबट्याचा संग्रहालयातील प्रशासनाचा शोध सुरु होता. पळालेल्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलासह पुणे, नाशिकची रेस्क्यू टीम, ५० सुरक्षा अधिकारी आणि कर्मचारी शोध घेत होते.

Pune's Katraj Zoo Leopard
Amit Shah Latest Speech : इंडिया आघाडीतील सर्व पक्ष घराणेशाही मानणारे; छत्रपती संभाजीनगरमधून अमित शहांचा हल्लाबोल

प्राणी संग्रहलयातील नर जातीच्या बिबट्याने पिंजऱ्याचे लोखंडी गज वाकवून धूम ठोकली होती. पिंजऱ्यातून पळालेला बिबट्या हा बिबट्या कर्नाटकमधील हंपी येथून आणण्यात आला होता. बिबट्याने संग्रहलयातून धूम ठोकल्याने परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं.

सोमवारी पहाटे बिबट्या फरार झाला होता. बिबट्या फरार झाल्याने कात्रज राजीव गांधी प्राणी संग्रहलयाजवळील वस्तीमधील लोक दहशतीखाली गेले होते. या बिबट्याने प्रशासनाचीही तारांबळ उडवली होती. या बिबट्याचा वनविभाग आणि सुरक्षा अधिकारी डोळ्यात तेल घालून बिबट्याचा शोध घेत होते. या अधिकाऱ्यांना ४८ तासानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात प्रशासनाला यश आलं आहे.

Pune's Katraj Zoo Leopard
Maharashtra Politics: राज्यात पुन्हा होणार राजकीय भूकंप; ठाकरे गट भाजपशी हातमिळवणी करणार?

या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. या बिबट्याच्या वेगवेगळ्या हालचाली टिपणासाठी कॅमेऱ्यासह ९ पिंजरे लावण्यात आले होते. पिंजऱ्यातून पळालेला बिबट्या एका पिंजऱ्यात अडकला. मंगळवारी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास आढळला.

बिबट्याला शोधण्यासाठी अग्निशमन दलासह विविध तैनात होती. या बिबट्याला काही दिवसांपासून त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले होते. मात्र, सोमवारी सकाळी पिंजऱ्यामध्ये बिबट्या नसल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com