Gautam Gaikwad : कुत्र्याला वाचवायला गेला अन् सिंहगडावरून पडला; किडे चावले, चक्कर आली, गौतम ५ दिवस जंगलात कसा राहिला?

Pune News : पुण्याच्या सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड तब्बल ५ दिवसांनंतर जिवंत सापडला. शंभर तास जंगलात अन्नपाणी न घेता कसे दिवस काढले याबाबत त्याने त्याच्या आईला सांगितले.
Gautam Gaikwad : कुत्र्याला वाचवायला गेला अन् सिंहगडावरून पडला; किडे चावले, चक्कर आली, गौतम ५ दिवस जंगलात कसा राहिला?
Pune newssaam tv
Published On
Summary
  • सिंहगड किल्ल्यावरून पाच दिवसांपासून बेपत्ता असलेला गौतम गायकवाड अखेर जिवंत सापडला

  • कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात गडाखाली पडल्याने तो जंगलात हरवला

  • चार दिवस अन्नपाणी न घेता जंगलात तग धरला, कीटकांच्या चाव्यांचा सामना केला

  • बचाव पथकाने रविवारी संध्याकाळी त्याला समाधीजवळ शोधून काढले आणि रुग्णालयात दाखल केले

पुण्याच्या सिंहगड किल्ल्यावर पाच दिवसांपासून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड अखेर जिवंत अवस्थेत सापडला आहे. जवळपास शंभर तास जंगलात हरवूनही प्राणपणाने संघर्ष करत गौतम वाचला आणि सध्या त्याच्यावर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने केवळ गायकवाड कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण गावकऱ्यांनाही दिलासा मिळाला असून, इतके दिवस जंगलात गौतम कसा राहिला? तो सिंहगडाच्या जंगलात कसा आला? याची हकीगत स्वतः गौतमने आपल्या आईला सांगितली.

मिळालेल्या माहितीनुसार गौतम गायकवाड हैदराबादहून आपल्या पाच मित्रांसह पुण्यातील सिंहगड येथे फिरायला गेला होता. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास हे सर्वजण सिंहगड किल्ल्यावर पोहोचले. संध्याकाळच्या सुमारास मित्रमंडळी तानाजी कड्याजवळ गेले असता गौतमने ‘मी थोड्या वेळात येतो’ असे सांगून दूर गेला. मात्र बराच वेळ उलटूनही तो परत न आल्याने मित्रांनी त्याचा शोध सुरू केला. त्या दरम्यान हवा पॉइंटजवळ गौतमची चप्पल आढळली, मात्र त्याचा काही पत्ता लागला नाही.

Gautam Gaikwad : कुत्र्याला वाचवायला गेला अन् सिंहगडावरून पडला; किडे चावले, चक्कर आली, गौतम ५ दिवस जंगलात कसा राहिला?
Gautam Gaikwad: सिंहगडावरून पडला,पाच दिवस जंगलातच; गौतम गायकवाडच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट!

गौतम प्रत्यक्षात किल्ल्याच्या कड्यावरून खाली पडला होता. त्यावेळी एक कुत्रा कड्याच्या टोकाजवळ आला होता आणि तो खाली घसरू लागला. प्राणीप्रेमी असलेल्या गौतमने कुत्र्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला आणि त्याचवेळी गौतमचाही तोल गेला. परिणामी तो आणि कुत्रा दोघेही गडाच्या खाली कोसळले.

Gautam Gaikwad : कुत्र्याला वाचवायला गेला अन् सिंहगडावरून पडला; किडे चावले, चक्कर आली, गौतम ५ दिवस जंगलात कसा राहिला?
Gautam Gaikwad Sinhgad : सिंहगड किल्ल्यावर बेपत्ता झालेला गौतम गायकवाड अखेर सापडला

गडाखाली असलेल्या दाट जंगलात पडल्यामुळे तो पूर्णपणे हरवून गेला. तब्बल चार दिवस त्याला योग्य असा रस्ता मिळालाच नाही. त्या काळात त्याने अन्नपाणी घेतले नाही. जंगलातील ओलसर गवत, पाने आणि झाडांच्या सावलीत त्याने आसरा घेतला. बरेच दिवस गौतमच्या पोटात अन्नपाणी नसल्यामुळे तो अशक्त झाला. अनेकदा चक्कर येऊन तो बेशुद्ध झाला होता. मात्र तिसऱ्या दिवसानंतर शुद्धीवर आल्यानंतर त्याने कसाबसा डोंगर चढायला सुरुवात केली.

Gautam Gaikwad : कुत्र्याला वाचवायला गेला अन् सिंहगडावरून पडला; किडे चावले, चक्कर आली, गौतम ५ दिवस जंगलात कसा राहिला?
Gautam Gaikwad Missing: सिंहगड किल्ल्याच्या तानाजी कड्यावरून गौतम गायकवाड बेपत्ता; तरूणासोबत काय घडलं?

गड चढायला लागल्यानंतर गौतमने मदतीसाठी अनेकदा आजूबाजूच्या लोकांना हाक मारली. गौतम सापडल्याची बातमी कळताच त्याचे आई-वडील व कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला. गौतम सापडल्यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. गौतमवर उपचार सुरु असून गेल्या पाच दिवसात नेमकं काय घडलं हे त्याने त्याची आई दिपा गायकवाड यांना सांगितले. दरम्यान आता गौतमाची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com