Gautam Gaikwad Missing: सिंहगड किल्ल्याच्या तानाजी कड्यावरून गौतम गायकवाड बेपत्ता; तरूणासोबत काय घडलं?

Gautam Gaikwad Missing From Sinhagad Fort: पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर एक धक्कादायक घटना घडली. गौतम गायकवाड नावाचा तरुण तानाजी कड्यावरून कोसळून बेपत्ता झाला. पोलिसांनी या प्रकरणाबद्दल संशय व्यक्त करत शोध मोहीम सुरू केलाय.
Gautam Gaikwad Missing From Sinhagad Fort:
Sinhagad Fort Tanaji Cliff tragedy: Search continues for missing youth Gautam GaikwadSaamtv
Published On
Summary
  • सिंहगड किल्ल्यावरील तानाजी कड्यावरून गौतम गायकवाड बेपत्ता झाला.

  • पोलिस, वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन व गिर्यारोहकांकडून शोधमोहीम सुरू आहे.

  • घटनेवर पोलिसांनी वेगळा संशय व्यक्त केला आहे.

  • घटनेला ४ दिवस उलटूनही गायकवाडचा शोध लागलेला नाही.

सचिन जाधव, साम प्रतिनिधी

पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर मित्रासोबत फिरायला आलेला गौतम गायकवाड तानाजी कड्यावरून खोल दरीत कोसळून बेपत्ता झाला. आज चौथ्या दिवशीही शोध यंत्रणा त्याचा शोध घेत आहे. पोलीस वनविभाग आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक गिर्यारोहण यांच्या मदतीने त्याचा तपास सुरूय. मात्र यामध्ये आता पोलिसांनी वेगळा संशय व्यक्त केलाय. गायकवाडसोबत नेमकं काय घडलं असा सवाल उपस्थित होत आहे.

Gautam Gaikwad Missing From Sinhagad Fort:
Pune News : पुणेकरांना मोठा दिलासा; सिंहगड रोडवरील नवा उड्डाणपूल लवकरच होणार सुरू

सिंहगड किल्ल्याच्या तानाजी कडा येथे हवा पॉइंटजवळ गौतम गायकवाडचा पाय घसरला आणि तो खोली दरीत कोसळला. त्यानंतर ४ दिवसांपासून तो बेपत्ता आहे. २४ वर्षीय गौतम गायकवाड हैदराबाद येथून आपल्या ५ मित्रासह पुणे येथे फिरायला आला होता. बुधवारी दुपारी ४:३० वाजता ते सिंहगडावर आले.या वेळेस सायंकाळच्या सुमारास तानाजी कड्याजवळ ते आले असता गौतम याने लघवीला जाऊन येतो असे मित्रांना सांगितले.मात्र बऱ्याच वेळानंतरही तो परत आला नाही.

Gautam Gaikwad Missing From Sinhagad Fort:
Pune: पुण्यात फिरण्यासाठी आला, मित्रांसोबत सिंहगड किल्ल्यावर गेला; तानाजी कड्यावरून दरीत पडून तरुण बेपत्ता

म्हणून मित्रांनी गौतम याचा शोध घेतला असता तो आढळून आला नाही.जवळच हवा पॉइंटशेजारी त्याची चप्पल सापडली,मात्र तो दिसला नाही. सिंहगड भागात मुसळधार पाऊस असून, वाऱ्याचा वेगही जास्त आहे.वाऱ्याचा व जमिनीचा अंदाज न आल्याने गौतम खोल दरीत कोसळला.यावरून घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन व ग्रामीण पोलीस कर्मचारी व स्थानिक गिर्यारोहण करून कार्यकर्ते या तरुणाचा त्या दिवशी पासून आज सलग चार दिवस शोध घेत आहेत. जवळपास एक हजार फुटापर्यंत खोल दरीत उतरून आपत्ती व्यवस्थापन पथक त्याचा शोध घेत आहेत.

गौतम गायकवाड हा मूळचा महाराष्ट्रीयन आहे. सिंहगड परिसरात ते फोटो व्हिडिओ करत गड पाहत होते. गौतमचा मोबाईल दुसऱ्या मित्राकडे असताना तो लघूशंकेसाठी बाहेर गेला. तो बराच वेळ परत आला नसल्यानं त्याचे मित्र सिंहगडावर त्याला शोधू लागले. मात्र आज सलग चार दिवस शोध कार्यामध्ये काहीही निष्पन्न झाले नाही. यावरून पोलिसांनी दुसऱ्या बाजूने तपास सुरू केलाय.

हुडी घातलेला तो कोण?

दरम्यान आज काल हवेली पोलिसांनी वनविभागाच्या वनसंरक्षण समितीच्या कोंढणपूर येथील उपद्रव शुल्क नाक्यावरील सीसीटीव्हीच्या फुटेज तपासले असता. यामध्ये तो बेपत्ता झाल्यानंतर दीड दोन तासांनंतर एक व्यक्तींने हुडी (टोपी असलेला टी-शर्ट) घालून एका मोटारीच्या पाठीमागून चालत तोंड लपून जात असल्याचे दिसून आले आहे.

तोंड लपून जाणारी ती व्यक्ती गौतम गायकवाड आहे का याबाबत याबाबत पोलीस काहीच स्पष्ट सांगू शकले नाहीत. हे फुटेज त्याच्या नातेवाईकांना आणि मित्र-मैत्रिणींना देखील दाखविली आहे. परंतु तो असावा की नसावा याबाबत एकमत होत नाही‌. यामध्ये गौतम गायकवाड आणि त्याचे मित्र सिंहगडावर एकत्र असताना त्यांनी काढलेला व्हिडिओ सोबत आहे. यामध्ये पिवळा रेनकोट घातलेला व्यक्ती गौतम गायकवाड आहे.कोंढणपूर टोल नाक्यावरील दोन सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. यात एक संशयास्पद व्यक्ती तोंड लपून पळून जाताना दिसत आहे.

सिंहगड किल्ल्यावरील बेपत्ता तरुणाचा अद्याप शोध सुरूच आहे.मात्र पोलिसांना वेगळाच संशय आहे.गौतम गायकवाडच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे मिसिंग तक्रार दाखल केली आहे. गौतम गायकवाडच्या संदर्भात दोन सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोंड लपून पळून जाताना दिसतोय. गौतम गायकवाडने आर्थिक देवाणघेवाणीतून बनाव रचल्याचा संशय पोलिसांना आहे.यामुळे आता हवेली पोलीस दोन्ही बाजूने तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com